मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सचा अखेरचा साखळी सामना आज कोलकाता नाइट रायडर्सबरोबर रंगणार आहे. मुंबईने ाहा सामना जिंकला तर त्यांना अव्वल स्थानावर विराजमान होईल. पण कोलकाताने जर हा सामना गमावला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
LIVE
Get Latest Updates
11:28 PM
मुंबईने मारली गुणतालिकेत बाजी
11:18 PM
मुंबई अव्वल स्थानी
11:09 PM
रोहित शर्माचे अर्धशतक
10:40 PM
क्विंटन डीकॉक आऊट
क्विंटन डीकॉकच्या रुपात मुंबईला पहिला धक्का बसला. क्विंटन डीकॉकला 30 धावा करता आल्या.
09:45 PM
कोलकात्याचे मुंबईपुढे 134 धावांचे आव्हान
09:28 PM
नितीष राणा आऊट
नितीष राणाच्या रुपात केकेआरला पाचवा धक्का बसला. राणाला 26 धावा करता आल्या.
09:11 PM
रसेल शून्यावर आऊट
आंद्रे रसेलच्या रुपात केकेआरला मोठा धक्का बसला. रसेलला भोपळाही फोडता आला नाही.
09:10 PM
दिनेश कार्तिक आऊट
कार्तिकच्या रुपात कोलकाताला तिसरा धक्का बसला. कार्तिकला तीन धावा करता आल्या.
08:45 PM
हार्दिक पंडयाने केले दोन्ही सलामीवीरांना आऊट
07:36 PM
मुंबईने नाणेफेक जिंकली, केकेआरची प्रथम फलंदाजी
केकेआरविरुद्धच्या निर्णायक सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली. मुंबईने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले आहे.