IPL 2019 : मलिंगाने रसेलला कसे केले शून्यावर आऊट, पाहा हा व्हिडीओ

या सामन्यात रसेलला भोपळाही फोडता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 10:29 PM2019-05-05T22:29:41+5:302019-05-05T22:31:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: How to do Andre Russell out on zero by Lasith Malinga, see the video | IPL 2019 : मलिंगाने रसेलला कसे केले शून्यावर आऊट, पाहा हा व्हिडीओ

IPL 2019 : मलिंगाने रसेलला कसे केले शून्यावर आऊट, पाहा हा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्ससाठी हा सामना निर्णायक होता. त्यामुळे या सामन्यात आंद्रे रसेल मोठी खेळी करेल, असे साऱ्यांना वाटत होते. पण या सामन्यात रसेलला भोपळाही फोडता आला नाही. मुंबई इंडियन्सच्यालसिथ मलिंगाने रसेलला शून्यावर बाद केले. पण मलिंगाने रसेलला कसे बाद केले, तो व्हिडीओमध्ये पाहता येईल.

हा पाहा खास व्हिडीओ


कोलकात्याच्या तेराव्या षटकामध्ये रसेल फलंदाजीला आला, पण पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. मलिंगाने वेगाने एक चेंडू रसेलच्या बॅटजवळून टाकला. हा चेंडू रसेलच्या बॅटला लागून थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. यष्टीरक्षक क्विंटर डीकॉकने कोणतीही चूक न करता हा झेल टिपला. त्यामुळे रसेलला पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतावे लागले.


मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सला 133 धावांवर समाधान मानावे लागले. मुंबईकडून लसिथ मलिंगाने तीन आणि हार्दिक पंड्याने दोन फलंदाजांना बाद केले.

मुंबईने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. कोलकाताचा सलामीवीर ख्रिस लिनने झोकात सुरुवात केली. पण हार्दिक पंड्याने मात्र ख्रिस लिन आणि शुभमन गिल या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. हे दोन धक्के बसल्यावर कोलकाताचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. आंद्रे रसेलला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार दिनेश कार्तिकलाही फक्त तीन धावांवर समाधान मानावे लागले.


सचिनने वानखेडेच्या पीच जवळून पाहतो तेव्हा...
मुंबई इंडियन्सचा अखेरचा साखळी सामना आज कोलकाता नाइट रायडर्सबरोबर रंगणार आहे. मुंबईने हा सामना जिंकला तर त्यांना अव्वल स्थानावर विराजमान होईल. पण कोलकाताने जर हा सामना गमावला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. या सामन्याचे महत्व लक्षात घेता माजी महान फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरने वानखेडेच्या पीचची पाहणी केल्याचे पाहायला मिळाले.

सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघ सराव करत होते. त्यावेळी सचिन खेळाडूंना मार्गदर्शन करत होता. त्यानंतर कालांतराने सचिन वानखेडेच्या पीचजवळ गेला आणि पीच न्याहाळले. पीचला हात लावून खेळपट्टीचा पोत पाहिला.


वानखेडेवर रंगला आंद्रे रसेलचा डान्स, पाहा हा व्हिडीओ
मुंबई इंडियन्सबरोबरचा आजचा सामना हा कोलकाता नाइट रायडर्ससाठी सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे केकेआरच्या खेळाडूंवर सर्वात जास्त दडपण असेल, असे म्हटले जात आहे. पण सामन्यापूर्वी वानखेडेवर केकेआरच्या आंद्रे रसेलचा खास डान्स चाहत्यांना पाहायला मिळाला. आयपीएलने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सामन्यापूर्वी दोन्ही संघ सराव करत होते. त्यावेळी रसेल आपल्यात मस्तीत मश्गूल असलेला पाहायला मिळाला. सराव करत असताना रसेलने डान्स करायला सुरुवात केली. खास वेस्ट इंडिजच्या स्टाइलमध्ये रसेल डान्स करत होता. त्याचा हा डान्सचा आनंद चाहत्यांनीही लुटला.

पाहा हा व्हिडीओ


Web Title: IPL 2019: How to do Andre Russell out on zero by Lasith Malinga, see the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.