IPL 2019 : गेलच्या वादळानंतरही पंजाबचे दिल्लीपुढे 164 धावांचे आव्हान

गेलने आपल्या तुफानी फटकेबाजीने दिल्लीच्या गोलंदाजांना नतमस्तक होण्यास भाग पाडले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 09:35 PM2019-04-20T21:35:50+5:302019-04-20T21:47:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Even after Gayle Strike, Punjab's challenge of 164 runs to Delhi Capitals | IPL 2019 : गेलच्या वादळानंतरही पंजाबचे दिल्लीपुढे 164 धावांचे आव्हान

IPL 2019 : गेलच्या वादळानंतरही पंजाबचे दिल्लीपुढे 164 धावांचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेलने आपल्या तुफानी फटकेबाजीने दिल्लीच्या गोलंदाजांना नतमस्तक होण्यास भाग पाडले होते. पण गेल बाद झाल्यावर पंजाबच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.



 

दिल्लीने नाणेफे जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. लोकेश राहुलने आक्रमक फलंदाजी केली, पण त्याला 12 धावावंरच समाधान मानावे लागले. त्यानंतर गेलचे वादळ पाहायला मिळाले. गेलने सहा चौकार आणि पाच षटकाराच्या जोरावर 37 चेंडूंत 69 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. गेलचा अप्रतिम झेल यावेळी सीमारेषेवर लिन इनग्राम आणि अक्षर पटेल यांनी पकडला. हा झेल अप्रतिम असाच होता. गेलला यावर विश्वास बसला नाही. पण गेलला तिसऱ्या पंचांनी बाद दिले. गेल बाद झाल्यावर मात्र पंजाबच्या संघाला जलदगतीने धावा जमवण्यात अपयश आले.

 

... अशी कॅच तुम्ही आतापर्यंत पाहिली नसेलच, ख्रिस गेललाही विश्वास बसला नाही


दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने धडाकेबाज फलंदाजी केली. पण ख्रिस गेलचा झेल जो यावेळी पकडला तो तुम्ही कधीही पाहिला नसेल. गेलला तर हा झेल पकडलाय यावर विश्वाच बसला नाही.

बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गेलने षटकार लगावला. दुसऱ्या चेंडूवरही गेलने मोठा फटका मारला. पण हा चेंडू सीमारेषेजवळ असलेल्या कॉलिन इन्ग्रामने पकडला. पण चेंडू पकडल्यावर त्याला तोल जात होता. आपला तोल जातोय हे कॉलिनला समजले. त्यावेळी त्याने आपल्या जवळ कोणी क्षेत्ररक्षण आहे का, हे पाहिले. त्यावेळी अक्षर पटेल कॉलिनच्या जवळ होता. त्यावेळी कॉलिनने हा चेंडूं थेट अक्षरच्या हातामध्ये फेकला आणि गेल बाद झाला.

गेल आऊट आहे कि नाही, हे मैदानावरील पंचांनाही ठरवता येत नव्हते. त्यावेळी मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी बऱ्याच वेळा ही गोष्ट पाहिली आणि अखेर गेल बाद असल्याचा निर्णय दिला.

Web Title: IPL 2019: Even after Gayle Strike, Punjab's challenge of 164 runs to Delhi Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.