IPL 2018 : चेन्नई सुपरकिंग्जकडून 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरचा अपमान 

चेन्नई सुपरकिंग्जनं आपल्या ट्विटर हँडलवरून सचिन आणि सुरेश रैनाचा एक फोटो शेअर केला....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 02:02 PM2018-05-03T14:02:34+5:302018-05-03T14:02:53+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2018 csk tweet insult sachin tendulkar by a tweet with suresh raina | IPL 2018 : चेन्नई सुपरकिंग्जकडून 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरचा अपमान 

IPL 2018 : चेन्नई सुपरकिंग्जकडून 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरचा अपमान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्लीः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी देवासमान आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. भारतीय क्रिकेटचा तारणहार म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातं. 'आपल्या सचिन'वरची टीका चाहते खपवून घेऊच शकत नाहीत. असं असताना, दुसरं-तिसरं कुणी नव्हे; तर आयपीएलमधील सगळ्यांच्या 'फेव्हरिट' चेन्नई सुपरकिंग्जनेच सचिनचा अपमान केल्याचं समोर आलं आणि नेटिझन्सनी त्यांची चांगलीच धुलाई केली. 

चेन्नई सुपरकिंग्जनं आपल्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला. सुरेश रैना आणि सचिन तेंडुलकर पॅव्हेलियनकडे जात असल्याचं या फोटोत दिसतं. दोघांच्याही चाहत्यांना आवडेल असाच हा फोटो होता. पण, त्याला जी कॅप्शन दिली होती, ती आक्षेपार्ह होती. 

सचिन आणि रैनाच्या फोटोखाली Ramesh and Suresh 😍#whistlepodu ही नावं पाहून सचिन चाहत्यांची सटकलीच. कारण, सचिनच्या वडिलांचं नाव रमेश तेंडुलकर आहे. त्यांच्या नावाने सचिनला संबोधणं सगळ्यांनाच खटकलं.  एखाद्या क्रिकेटपटूबद्दल गंमत करायला हरकत नाही, पण भारतरत्न, क्रिकेटमधील विक्रमादित्यासोबत अशा प्रकारे टिंगल करणं कुणालाच रुचलं नाही. काही चाहत्यांनी तर चेन्नई सुपरकिंग्जचं ट्विटर हँडलच बंद करण्याची मागणी केली.  





 

Web Title: ipl 2018 csk tweet insult sachin tendulkar by a tweet with suresh raina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.