हार्दिक पांड्याने खरेदी केली ही महागडी कार, किंमत वाचून व्हाल थक्क

अनेक मोठ्या कंपन्यांच्या कार्स खरेदी केल्या आहेत. आता पुन्हा त्याच्या कार कलेक्शनमध्ये एका महागड्या गाडीचा समावेश झालाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 11:02 AM2018-04-19T11:02:32+5:302018-04-19T11:02:32+5:30

whatsapp join usJoin us
Indian cricketer Hardik Pandya buys Audi A6 luxury sedan | हार्दिक पांड्याने खरेदी केली ही महागडी कार, किंमत वाचून व्हाल थक्क

हार्दिक पांड्याने खरेदी केली ही महागडी कार, किंमत वाचून व्हाल थक्क

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या हा त्याच्या दमदार खेळासोबतच खास लाईफस्टाईलसाठीही तितकाच लोकप्रिय आहे. हार्दिक पांड्याला हा महागड्या गाड्यांचा चांगलाच शौकीन आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्याने अनेक मोठ्या कंपन्यांच्या कार्स खरेदी केल्या आहेत. आता पुन्हा त्याच्या कार कलेक्शनमध्ये एका महागड्या गाडीचा समावेश झालाय.

(Image Credit: www.cartoq.com)

स्टायलिश हार्दिक पांड्याने नुकतीच ऑडी A6 ही महागडी कार खरेदी केली आहे. ऑडी A6 ही एक सेडान कार असून या कारची किंमत तब्बल 62.81 लाख रुपये इतकी आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख राहिल अंसारी यांनी स्वत: ही कार हार्दिक पांड्याकडे सोपवली. 

काय आहे या कारची खासियत?

ही कार पेट्रोल आणि डीझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या इंजिनबाबात सांगायचं तर पेट्रोस मॉडेलमध्ये 1798 सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. ही कार 0 ते 100 किमी प्रति तासाचा प्रवास करण्यासाठी 8.4 सेकंद लागतात. या कारची टॉप स्पीड 232 kmph इतका आहे.

Web Title: Indian cricketer Hardik Pandya buys Audi A6 luxury sedan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.