India vs New Zealand T20 : कॅप्टन कोहली, धोनी यांना मागे टाकून हिटमॅन रोहित शर्मा टॉप!

India vs New Zealand T20: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडवर दुसऱ्या ट्वेंटी-20 लढतीत सात विकेट्स राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 01:27 PM2019-02-09T13:27:26+5:302019-02-09T13:27:49+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand T20: Rohit Sharma beats Virat Kohli, MS Dhoni to bag elite captaincy record; goes joint-top in overall list | India vs New Zealand T20 : कॅप्टन कोहली, धोनी यांना मागे टाकून हिटमॅन रोहित शर्मा टॉप!

India vs New Zealand T20 : कॅप्टन कोहली, धोनी यांना मागे टाकून हिटमॅन रोहित शर्मा टॉप!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडवर दुसऱ्या ट्वेंटी-20 लढतीत सात विकेट्स राखून विजय मिळवला. भारताचा गेल्या दहा वर्षांतील न्यूझीलंडमधील हा पहिला विजय ठरला आहे. 2009 साली भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दोन ट्वेंटी-20 सामने खेळला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. या विजयाबरोबर भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली आहे. या विजयासह कर्णधार रोहित शर्माने एका विक्रमात विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. कर्णधार म्हणून पहिल्या 14 सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत रोहित अव्वल ठरला आहे.

भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात सात विकेट राखून विजय मिळवला. रोहितने शुक्रवारच्या सामन्यात 29 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 50 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीसह त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. यापूर्वी हा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तीलच्या नावावर होता. रोहितच्या 2288 धावा झाल्या आहेत. गुप्तीलच्या नावावर 2272 धावा आहेत. रोहितने पाकिस्तानच्या शोएब मलिकलाही मागे सोडले. 

या विक्रमाव्यतिरिक्त रोहितने आणखी एक विक्रम नावावर केला. त्याने भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक 12 सामने जिंकण्याच्या कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण, कर्णधार म्हणून पहिल्या 14 सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या खेळाडूंत रोहितने कोहली व धोनीलाही मागे टाकले. या दोघांनी पहिल्या 14 सामन्यांत प्रत्येकी 8 सामने जिंकले होते. रोहितने मात्र 12 सामने जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद व ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क यांच्याशी बरोबरी केली आहे. 
 



भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला तिसरा सामना रविवारी हॅमिल्टन येथे होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला इतिहास घडवण्याची संधी आहे. 

Web Title: India vs New Zealand T20: Rohit Sharma beats Virat Kohli, MS Dhoni to bag elite captaincy record; goes joint-top in overall list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.