Ind Vs Pak: भारत सुसाट... पाकिस्तान भुईसपाट

भारताने रोहित आणि धवनच्या दमदार शतकांमुळे सहज विजय मिळवला. धवनने 100 चेंडूंत 16 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 114 धावा केल्या. रोहितने 119 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 111 धावांची खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 04:45 PM2018-09-23T16:45:30+5:302018-09-24T02:50:27+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Pak Live score Updates of Asia Cup 2018: Pakistan won the toss and elected to bat | Ind Vs Pak: भारत सुसाट... पाकिस्तान भुईसपाट

Ind Vs Pak: भारत सुसाट... पाकिस्तान भुईसपाट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देशतकासह रोहितने एकदिवसीय कारकिर्दीतील सात हजार धावा पूर्ण केल्या.

भारत सुसाट... पाकिस्तान भुईसपाट

दुबई : गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर सलामीवीर शिखर धवन (११४ धावा, १०० चेंडू, १४ चौकार, २ षटकार) आणि रोहित शर्मा (नाबाद १११ धावा, ११९ चेंडू, ७ चौकार, ४ षटकार) यांनी वैयक्तिक शतके झळकावित सलामीला केलेल्या २१० धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने रविवारी आशिया चषक क्रिकेट सुपर फोर लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ९ गडी व ६३ चेंडू राखून पराभव केला. भारताने या स्पर्धेत विजय मोहीम कायम राखत जवळजवळ अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
भारताने पाकिस्तानचा डाव ७ बाद २३७ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा ३९.३ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. शिखर धवन धावबाद झाल्यानंतर रोहित शर्माने अंबाती रायडूच्या (नाबाद १२ ) साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले. शतकी खेळीदरम्यान रोहितने वन-डे क्रिकेटमध्ये १९ वे शतक झळकावताना सात हजार धावांचा पल्ला गाठला.
त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा करीत पाकिस्तानला शोएब मलिकच्या अर्धशतकी खेळीनंतरही ७ बाद २३७ धावांत रोखले. शिखरचे वन-डे कारकीर्दीतील हे १५ वे शतक ठरले.
भारताने सुरुवातीला तीन बळी घेत वर्चस्व गाजवले. त्यानंतर फॉर्मात असलेला शोएब मलिक (७८ धावा, ९० चेंडू) आणि कर्णधार सरफराज अहमद (४४) यांनी तिसºया विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.
भारताने अखेरच्या ८ षटकांत केवळ ४४ धावा बहाल करताना पुनरागमन केले. ४२ व्या षटकांत पाकिस्तानने ४ बाद १९३ धावांची मजल मारली होती. त्यानंतरच्या ८ षटकांत त्यांना केवळ एक चौकार लगावता आला. भारताला पुनरागमन करून देण्यात जसप्रीत बुमहारने (२-२९) महत्त्वाची भूमिका बजावली. युजवेंद्र चहल (२-४६) व कुलदीप यादव (२-४२) यांनीही चांगला मारा केला.
बुमराहने त्याआधी, भुवनेश्वरच्या साथीने सुरुवातीला अचूक मारा केला. पहिल्या ७ षटकांत पाकला केवळ २१ धावा करता आल्या होत्या. चहलने आपल्या पहिल्याच षटकात इमाम उल हक (१०) याला पायचित केले. भारताला यासाठी मात्र डीआरएसचा आधार घ्यावा लागला.
कुलदीपने फखर जमाविरुद्ध (३१) केलेले पायचितचे अपील पंचांनी उचलून धरले. रिप्लेमध्ये चेंडू फलंदाजाच्या ग्लोव्हजला चाटून गेल्याचे स्पष्ट झाले, पण त्याने डीआरएसचा अवलंब केला नाही. बाबर आजम (९) धावबाद झाल्यामुळे पाकिस्तानची ३ बाद ५८ अशी अवस्था झाली होती. फॉर्मात असलेल्या शोएबने लौकिकाला साजेशी फलंदाजी करताना मैदानाच्या चौफेर धावा वसूल केल्या. ६४ चेंडूंना सामोरे जाताना त्याने वैयक्तिक ४३ वे अर्धशतक झळकावले. भारताविरुद्ध त्याचे हे १२ वे अर्धशतक आहे. सरफराजने स्ट्राईक रोटेट करण्यावर भर दिला, पण ६६ चेंडूंच्या खेळीमध्ये त्याने केवळ दोन चौकार लगावले. (वृत्तसंस्था)

रोहितच्या वेगवान ७ हजार धावा
‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने पाकविरुद्ध १९ वे वन डे शतक झळकवून सात हजार धावांचा देखील टप्पा गाठला. सलामीला आलेल्या रोहितने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळून नाबाद १११ धावा ठोकल्या.
चहलचे ५० बळी
फिरकीपटू युजवेंद्र चहलचे रविवारी बळींचे अर्धशतक पूर्ण झाले. चहलने आसिफ अलीला त्रिफळाचीत करत पन्नासावा बळी साजरा केला.
अन् मुशर्रफ यांनी मैदान सोडले
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी द्यायला सुरुवात केली. या दोघांची फटकेबाजी सुरू असताना पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी मैदानातून काढता पाय घेतला. 
धावफलक
पाकिस्तान : इमाम उल हक पायचित गो. चहल १०, फखर जमा पायचित गो. कुलदीप ३१, बाबर आझम धावबाद ९, सर्फराज अहमद झे. रोहित गो. कुलदीप ४४, शोएब मलिक झे. धोनी गो. बुमराह ७८, आसिफ अली त्रि.गो. चहल ३०, शादाब खान त्रि.गो. बुमराह १०, मोहम्मद नवाझ नाबाद १५, हसन अली नाबाद २, अवांतर ८, एकूण: ५० षटकांत ७ बाद २३७ धावा. गडी बाद क्रम : १/२४, २/५५, ३/५८, ४/१६५, ५/२०३, ६/२११, ७/२३४. गोलंदाजी : भुवनेश्वर ९-०-४६-०, बुमराह १०-१-२९-२, चहल ९-०-४६-२, कुलदीप १०-०-४१-२, जडेजा ९-०-५०-०, जाधव ३-०-२०-०.
भारत : रोहित शर्मा नाबाद १११, शिखर धवन धावबाद ११४, अंबाती रायुडू नाबाद १२,अवांतर: १, एकूण: ३९.३ षटकांत एक बाद २३८. गडी बाद क्रम:१/२१०, गोलंदाजी: मोहम्मद आमेर ५-०-४१-०, शाहीन आफ्रिदी ६-०-४२-०, हसन अली ९-०-५२-०, मोहम्मद नवाज ७-०-३५-०, शादाब खान ८-०-५४-०, शोएब मलिक ४.३-०-१४-०

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय



 

कर्णधार रोहित शर्माचे शतक



 

शिखर धवनचा रनआऊट होत आत्मघात



 

शिखऱ धवनचे चौकारासह शतक



 

रोहित शर्माला 81 धावांवर पुन्हा जीवदान

रोहितला 14 धावांवर असताना पहिल्यांदा जीवदान मिळाले होते. त्यानंतर 81 धावांवर असताना पुन्हा एतदा त्याचा झेल सुटला.

रोहित शर्माचे दमदार शतक



 

 भारताचे 20व्या षटकात शतक पूर्ण

भारताची दमदार सलामी, 15 षटकांत बिनबाद 72 

धवनच्या चौकारासह भारताचे दहाव्या षटकात अर्धशतक



 

रोहित शर्माला 14 धावांवर असताना जीवदान

षटकार लगावल्यानंतर शाहिन आफ्रिदीच्या पुढच्याच चेंडूवर रोहित शर्माला जीवदान मिळाले. रोहित तेव्हा 14 धावांवर होता. इमाम उल हकने रोहितचा सोपा झेल सोडला.

भारताकडून रोहित शर्माचा पहिला षटकार



 

भारत 5 षटकांत बिनबाद 23

शिखर धवनची दोन चौकारांनी धमाकेदार सुरुवात



 

 



 

भारताचा भेदक मारा; पाकिस्तानच्या 237 धावा

दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान: शोएब मलिकच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 237 धावा करता आल्या. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मलिकने 90 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 78 धावांची खेळी केली आणि त्यामुळेच पाकिस्तानला या सामन्यात द्विशतकाची वेस ओलांडता आली. युजवेंद्र चहलने या सामन्यात दोन बळी मिळवत कारकिर्दीतील बळींचे अर्धशतक पूर्ण केले.



 

पाकिस्तानला सातवा धक्का; शादाब खान बाद



 

पाकिस्तानला सहावा धक्का; आसिफ अली बाद



 

शोएब मलिक बाद; पाकिस्तानला मोठा धक्का



 

 

भुवनेश्वरच्या 42व्या षटकात आल्या तब्बल 22 धावा

भुवनेश्वरच्या 42व्या षटकात पाकिसत्नाच्या फलंदाजांनी प्रत्येकी दोन षटकार आणि चौकारांसह 22 धावा लूटल्या.

हुश्श... अखेर पाकिस्तानची जोडी फुटली; कर्णधार सर्फराझ बाद



 

शोएब मलिकचे अर्धशतक, पाकिस्तान ३५ षटकांत ३ बाद १४१



 

पाकिस्तान 30 षटकांत 3 बाद 116

पाकिस्तानचे २८व्या षटकात शतक पूर्ण

पाकिस्तान 25 षटकांत 3 बाद 92

पाकिस्तान 20 षटकांत 3 बाद 71 

पाकिस्तानला तिसरा धक्का; बाबर आझम चहलकडून धावचीत



 

पाकिस्तानला दुसरा धक्का; फखर झमान बाद



 

पाकिस्तानचे चौदाव्या षटकात अर्धशतक पूर्ण

पाकिस्तानला पहिला धक्का, सलामीवीर इमाम बाद


पाकिस्तानची सावध फलंदाजी; ६ षटकांत बिनबाद २० धावा

दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान : पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवल्यावर आता भारतीय संघ दुसऱ्यांदा आशिया चषकात पाकिस्तानशी दोन हात करायला सज्ज झाला आहे. सुपर-4'मधील भारताचा हा दुसरा सामना आहे. भारताने सुपर-4'मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला होता. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत सलग तीन विजय मिळवले आहेत. भारताची ही विजयी घोडदौड या सामन्यात कायम राहणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

 

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली



 

दोन्ही संघ



 



 

Web Title: Ind vs Pak Live score Updates of Asia Cup 2018: Pakistan won the toss and elected to bat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.