IND vs AUS 1st Test: ... and Virat Kohli has gone on Australia's batsman, watch this video | IND vs AUS 1st Test : ... अन् विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजावर धावून गेला, पाहा हा व्हिडीओ
IND vs AUS 1st Test : ... अन् विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजावर धावून गेला, पाहा हा व्हिडीओ

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहली हा पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाजवळ जाऊन स्लेजिंग करत असल्याचे पाहायला मिळाले. जसप्रीत बुमरा हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनसाठी भेदक मारा करत होता. त्यावेळी स्लीपमध्ये उभा असलेला कोहली पेनजवळ आला आणि त्याला काही तरी बोलला. ही सारी घटना एका व्हिडीओमध्ये कैद झाली आहे.

पाहा हा व्हिडीओ


इशांत शर्माने आरोन फिंचला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्का दिला. त्यानंतर फिरकीपटू आर. अश्विनने तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. त्यावेळी पीटर हँड्सकॉम्ब संघासाठी धावून आला, त्याने पाच चौकारांच्या जोरावर ३४ धावा केल्या. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव पूर्णपणे सावरलेला नव्हता. त्यावेळी हेडने चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. हेडने सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ६१ धावांची खेळी साकारली. हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद 191अशी मजल मारली आहे.Web Title: IND vs AUS 1st Test: ... and Virat Kohli has gone on Australia's batsman, watch this video
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.