ICC च्या नियमावरून हिटमॅन रोहितनं व्यक्त केली चिंता, म्हणाला...

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढत ही चुरशीची झाली, परंतु ज्या नियमावरून यजमान इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले त्यावरून चांगलीच चर्चा रंगत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:40 PM2019-07-15T12:40:09+5:302019-07-15T12:40:35+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup Final 2019 : Rohit sharma expressed concern over ICC rules, said... | ICC च्या नियमावरून हिटमॅन रोहितनं व्यक्त केली चिंता, म्हणाला...

ICC च्या नियमावरून हिटमॅन रोहितनं व्यक्त केली चिंता, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढत ही चुरशीची झाली, परंतु ज्या नियमावरून यजमान इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले त्यावरून चांगलीच चर्चा रंगत आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला हा सामना निर्धारीत 50 षटकांत 241-241 असा आणि सुपर ओव्हरमध्ये 15-15 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे सर्वाधिक चौकार मारणाऱ्या इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. न्यूझीलंडने या सामन्यात 14, तर इंग्लंडने 22 चौकार मारले. त्यामुळे इंग्लंडला जेतेपदाचा मान मिळाला.  भारताचे माजी खेळाडू गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांनी आयसीसीच्या नियमावर नाराजी प्रकट केली. त्यात आता भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू आणि वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या रोहित शर्मानंही चिंता व्यक्त केली आहे. 

रोहित, स्टार्क अव्वल तरीही 'यानं' पटकावला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान! 

जोफ्रा आर्चर ठरला 'ज्योतिषाचार्य'; चार वर्षांपूर्वीचं भाकित तंतोतंत खरं ठरलं!

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून 8 बाद 241 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 241 धावांवरच तंबूत परतला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यातही इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंडला 15 धावा करता आल्या. सर्वाधिक चौकार मारल्यामुळे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यात बेन स्टोक्सने जीगरबाज खेळी केली. त्यानं 98 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार लगावून 84 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. 


यावर रोहितनं ट्विट केलं की,''आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही नियमांचा गांभीर्यानं विचार व्हायला हवा.'' 


हा काय फालतू नियम? 
माजी खेळाडू गौतम गंभीरनं आयसीसीच्या नियमावर टीका केली. तो म्हणाला,''वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचा निकाल असा कसा ठरवला जाऊ शकतो, हेच कळत नाही. हा हास्यास्पद नियम आहे. हा सामना बरोबरीत सुटला आहे. दोन्ही संघांचे मी अभिनंदन करू इच्छितो. दोघेही विजेते आहेत.'' 


युवराजनं लिहीलं की,'' या नियमाशी मी सहमत नाही. पण, नियम हे नियम असतात. वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडचे मी अभिनंदन करतो. न्यूझीलंडने अखेरपर्यंत कडवी झुंज दिली.'' 

इंग्लंडच्या विजयात 'परप्रांतियांचा' मोठा वाटा, जाणून घ्या कसा!

न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या खेळाडूनं केला किवींचा पराभव; कोण आहे घर का भेदी?

ICC World Cup 2019 : क्रिकेट, ये खेल है महान!

 

Web Title: ICC World Cup Final 2019 : Rohit sharma expressed concern over ICC rules, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.