ICC World Cup 2019 : टाकाऊ पासून टिकाऊ; श्रीलंकन संघाची Eco-Friendly जर्सी, Video

ICC World Cup 2019: श्रीलंका संघाने नुकतीच त्यांच्या जर्सीचे अनावरण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 02:40 PM2019-05-05T14:40:45+5:302019-05-05T14:44:03+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Sri Lankan team's unveil their Eco-friendly jersey, Video | ICC World Cup 2019 : टाकाऊ पासून टिकाऊ; श्रीलंकन संघाची Eco-Friendly जर्सी, Video

ICC World Cup 2019 : टाकाऊ पासून टिकाऊ; श्रीलंकन संघाची Eco-Friendly जर्सी, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी श्रीलंका संघाने नुकतीच त्यांच्या जर्सीचे अनावरण केले. ही जर्सी पूर्णपणे टाकाऊ पासून टिकाऊ या तत्वावर तयार करण्यात आली आहे. समुद्रातून गोळा केलेल्या प्लास्टिकपासून ही जर्सी तयार करण्यात आली असून श्रीलंकेच्या या इको फ्रेंडली जर्सीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय संघानेही मागील काही महिन्यांपूर्वी अशाच इको फ्रेंडली जर्सीचे अनावरण केले होते. आज आपण या जर्सीचा प्रवास पाहणार आहोत. 



श्रीलंकेच्या निवड समितीने वर्ल्ड कप स्पर्धेत संघाचे नेतृत्वा दिमुथ करुणारत्नेकडे सोपवले आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांमध्ये करुणारत्ने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. या संघात काही माजी कर्णधारांचा समावेश आहे. त्याचबरोबर संघातील अनुभवी खेळाडूंना डावलून करुणारत्नेला संघाचे कर्णधारपद निवड समितीने दिले आहे.

श्रीलंकेचा संघ - दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अविष्का फर्नांडो, लाहिरू थिरिमाने, कुशल परेरा (विकेटकीपर), कुशल मेंडिस (विकेटकीपर), अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डि'सिल्वा, जेफ्री वैंडेसरे, थिसारा परेरा, इसुरु उडाना, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंदा श्रीवर्दना. 
पाहा जर्सीचा प्रवास...



श्रीलंकेचे सामने
1 जून - वि. न्यूझीलंड
4 जून - वि. अफगाणिस्तान
7 जून - वि. पाकिस्तान
11 जून - वि. बांगलादेश
15 जून - वि. ऑस्ट्रेलिया
21 जून - वि. इंग्लंड
28 जून - वि. दक्षिण आफ्रिका
1 जुलै - वि. वेस्ट इंडिज
6 जुलै - वि. भारत

Web Title: ICC World Cup 2019: Sri Lankan team's unveil their Eco-friendly jersey, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.