ICC World Cup 2019 : धोनीला चौथ्या क्रमांकावर न पाठवण्यामागे होतं हे कारण, शास्त्रींचा खुलासा

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीसारखा अनुभवी खेळाडूला भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 12:35 PM2019-07-12T12:35:28+5:302019-07-12T12:35:51+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Ravi shastri made big disclosures on why MS dhoni did not came at number 4 in semifinal  | ICC World Cup 2019 : धोनीला चौथ्या क्रमांकावर न पाठवण्यामागे होतं हे कारण, शास्त्रींचा खुलासा

ICC World Cup 2019 : धोनीला चौथ्या क्रमांकावर न पाठवण्यामागे होतं हे कारण, शास्त्रींचा खुलासा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : महेंद्रसिंग धोनीसारखा अनुभवी खेळाडूला भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज अवघ्या 5 धावांवर तंबूत परतले होते आणि अशा परिस्थिती खेळपट्टीवर टिकून खेळणारा फलंदाज मैदानावर असणे आवश्यक होते. पण, तसे झाले नाही आणि न्यूझीलंडने 18 धावांनी विजय मिळवला. धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याच्या निर्णयावर सडकून टीका झाली. त्यामागचं कारण मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलं.

वर्ल्ड कप स्पर्धा आता आयपीएल फॉरमॅटमध्ये खेळवा, विराट कोहलीचा पर्याय

भारताचे चार फलंदाज अवघ्या 24 धावांवर माघारी  परतले होते. पहिला पॉवरप्ले संपल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानावर आल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले. पांड्यानं 62 चेंडूंत 32 धावा केल्या, पण चुकीचा फटका मारून तो माघारी परतला. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं धोनीला न पाठवण्याच्या निर्णयावर नाराजी प्रकट केली होती. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीलाही हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला,'' वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांत धोनीवर आम्ही जबाबदारी सोपवली होती. ती म्हणजे कठीण प्रसंगी मैदानावर उतरून परिस्थिती अवाक्यात आणायची, एका बाजूनं खेळपट्टीवर टिकून राहायचे आणि अखेरच्या 6-7 षटकांत फटकेबाजी करायची, ही ती जबाबदारी होती.''   

टीम इंडिया 'फायनल' बघूनच मायदेशी येणार, कारण...

याच प्रश्नावर बोलताना शास्त्री यांनी एका वेबसाईटला सांगितले की,''धोनीला चौथ्या क्रमांकावर पाठवले असते आणि तो लवकर बाद झाला असता, तर संघाच्या अडचणी आणखी वाढल्या असत्या. हा निर्णय संपूर्ण संघाचा होता. धोनी बाद झाल्यानंतर आव्हानाचा पाठलाग करणे कठीण झाले असते. त्याच्या अनुभवाची आम्हाला गरज होती. तो जगातील सर्वोत्तम फिनिशर आहे आणि त्याच्या उपयोग योग्य वेळी केला नसता, तर तो त्याला आणि संघाला न्याय देणारा ठरला नसता.''

सौरव गांगुलीनं व्यक्त केली होती नाराजी
गांगुली यावेळी म्हणाला की, " धोनीला चौथ्या क्रमांकावरच फलंदाजीला पाठवायला हवे होते. कारण तुम्ही 2011चा वर्ल्ड कप पाहिला असेल. 2011च्या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतही भारताची अशीच अवस्था होती. त्यावेळी धोनी कर्णधार होता. धोनी स्वत: त्यावेळी चौथ्या क्रमांकावर आला होता. चौथ्या क्रमांकावर येऊन धोनीने संघाच्या विजयावर षटकार मारत शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे या सामन्यातही धोनीला चौथ्या क्रमांकावर पाठवायला हवे होते."

Web Title: ICC World Cup 2019 : Ravi shastri made big disclosures on why MS dhoni did not came at number 4 in semifinal 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.