ICC World Cup 2019 : नवीन जर्सीसह जेतेपद कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्धार

ICC World Cup 2019 : भारतापाठोपाठ पाकिस्तानलाही वन डे मालिकेत पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे मनोबल उंचावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:36 IST2019-04-09T13:35:26+5:302019-04-09T13:36:33+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC World Cup 2019 : A new look for the Australia team at this year's World Cup | ICC World Cup 2019 : नवीन जर्सीसह जेतेपद कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्धार

ICC World Cup 2019 : नवीन जर्सीसह जेतेपद कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्धार

सिडनी, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतापाठोपाठ पाकिस्तानलाही वन डे मालिकेत पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे मनोबल उंचावले आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मिळालेल्या या मालिका विजयांनी ऑसी संघातील खेळाडूमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. त्यात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा एक वर्षांचा शिक्षेचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि वर्ल्ड कपमध्ये त्यांचे खेळणे निश्चित झाले आहे. या दोघांच्या आगमनाने ऑसी संघही जेतेपदाच्या शर्यतीत उतरला आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने मंगळावारी त्यांच्या जर्सीचे अनावरण केले. 2015च्या विजेता ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावणार का, याची उत्सुकता लागली आहे.

ASICS ही कंपनी ऑस्ट्रेलिया संघाच्या जर्सीचे उप्तादन घेते आणि त्यांनी ग्लेन मॅक्सवेलच्या फोटोसह ही घोषणा केली आहे. पिवळ्या रंग आणि कॉलर व खांद्यावर हिरवा रंग अशी ही जर्सी आहे. ट्रॅक्सवरही हिरव्या रंगाच्या रेघा आहेत. 



ही जर्सी 1999च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाच्या जर्सीसारखीच आहे. 


वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 1 जूनला अफगाणिस्तानशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या नावावर पाच वन डे वर्ल्ड कप आहेत आणि सर्वाधिक वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघात ते अग्रस्थानी आहेत. 

भारताविरुद्धच्या मालिकेत Rerto जर्सीचा प्रयोग
भारताविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील बरोबरी आणि कसोटी मालिकेतील शरणागतीनंतर ऑस्ट्रेलिया संघाने वन डे मालिकेसाठी Retro जर्सी परिधान केली होती. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ Retro लूक मध्ये दिसला होता. 1986च्या वन डे मालिकेत अॅलन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑसी संघाने याच Retro लूक जर्सीत भारताला 5-2 असे नमवले होते. त्यामुळे हा लुक त्यांना तारेल असा समज ऑसी संघाचा झाला होत, परंतु भारताने त्यांना पराभूत केले.  गडद पिवळा रंग आणि त्यावर आडवी हिरवी पट्टी व हिरवी कॉलर अशा प्रकारची जर्सी घालून ऑस्ट्रेलियाचा संघ वन डे मालिकेत खेळला होता. 


Web Title: ICC World Cup 2019 : A new look for the Australia team at this year's World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.