ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरोधात एकटा माही भारी, फलंदाजी आणि यष्टीरक्षणात दमदार कामगिरी 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज होणाऱ्या लढतीत भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या कामिगिरीकडे विशेष लक्ष राहणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 01:47 PM2019-06-09T13:47:47+5:302019-06-09T13:48:06+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: M. S. Dhoni's Strong performance against Australia | ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरोधात एकटा माही भारी, फलंदाजी आणि यष्टीरक्षणात दमदार कामगिरी 

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरोधात एकटा माही भारी, फलंदाजी आणि यष्टीरक्षणात दमदार कामगिरी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन - क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने येणार आहेत. या महामुकाबल्यामुळे आजचा रविवार क्रिकेटप्रेमींसाठी खास ठरणार आहे. या लढतीत दोन्ही संघांतील दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहणार आहे. त्यातही भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या कामिगिरीकडे विशेष लक्ष राहणार आहे. त्याचे कारण म्हणजे धोनीने गेल्या काही वर्षांपासून फलंदाजी आणि यष्टीरक्षणात केलेली जबरदस्त कामगिरी होय. 

भारतीय संघाची दीर्घकाळापर्यत धुरा वाहणाऱ्या महेंद्र सिंह धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना फलंदाजी आणि यष्टीरक्षण अशा दोन्ही पातळीवर चमक दाखवली आहे. 20118 नंतरच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास धोनीने या काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या लढतींमध्ये एकूण 92 च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत. या काळाता खेळलेल्या सहा एकददिवस सामन्यांपैकी तीन डावांत धोनीला बाद करणे ऑस्ट्रेलियन गोलांदाजांना शक्य झालेले नाही.

केवळ फलंदाजीच नव्हे तर यष्टीरक्षणामध्येही माहीचे आपली चपळता दाखवून दिली आहे. विशेषत: धोनीने यष्टीमागून दिलेला सल्ला हा फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे धोनीचे भारतीय संघातील महत्त्व अधोरेखित होते.  भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये जानेवारी महिन्यात झालेल्या द्विपक्षीय मालिकेत धोनीची कामगिरी निर्णायक ठरली होती. त्या मालिकेत धोनीला मालिकाविराचा बहुमान पटकावला होता. 

Web Title: ICC World Cup 2019: M. S. Dhoni's Strong performance against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.