ICC World Cup 2019 : इंग्लंडचा ओपनर जेसन रॉय फायनल खेळणार का? आयसीसीनं सुनावली 'ही' शिक्षा

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 01:18 PM2019-07-12T13:18:20+5:302019-07-12T13:18:49+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Jason Roy free to play World Cup final? England star fined 30% match fee, receives demerit points for dissent | ICC World Cup 2019 : इंग्लंडचा ओपनर जेसन रॉय फायनल खेळणार का? आयसीसीनं सुनावली 'ही' शिक्षा

ICC World Cup 2019 : इंग्लंडचा ओपनर जेसन रॉय फायनल खेळणार का? आयसीसीनं सुनावली 'ही' शिक्षा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचे 224 धावांचे लक्ष्य इंग्लंडने 32.1 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. 1992नंतर इंग्लंड प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. पण, या सामन्यात इंग्लंडचा सलामीवर जेसन रॉयनं पंचांशी हुज्जत घालून स्वतःवर संकट ओढावून घेतले आहे. रॉयला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) शिक्षा सुनावली आहे.

या सामन्यातील रॉय हा स्टार खेळाडू ठरला. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करून 65 चेंडूंत 85 धावा केल्या. त्यात 9 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर जो रूट ( 49*) आणि कर्णधार इयॉन मॉर्गन ( 45*) यांनी इंग्लंडचा विजय निश्चित केला. रॉयनं सलामीवीर जॉनी बेअरस्टो यांच्यासह 124 धावांची भागीदारी केली. 

जेसन रॉयला शिक्षा कशासाठी?
20 व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रॉयला चुकीच्या पद्धतीनं बाद देण्यात आले. चेंडू व्हाईडच्या दिशेनं गेला होता, त्यावर रॉयनं फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, बॅट आणि चेंडू यांच्यात काहीच संपर्क झाला नाही, तरीही ऑसी खेळाडूंनी अपील केलं. बऱ्याच वेळ अपील केल्यानंतर पंच कुमार धर्मसेनानं त्याला बाद ठरवले. त्यानंतर रॉयनं तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. या प्रकरणी आयसीसीनं रॉयला शिक्षा सुनावली आहे. रॉयला त्याच्या सामन्यातील मानधनातील 30 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. शिवाय त्याला दोन डिमेरिट्स गुणही मिळाले आहेत. पण, तो अंतिम फेरीत खेळणार आहे. 


अन् त्यानं बॅट जोरात आपटली



1996 नंतर प्रथमच क्रिकेटला लाभणार नवा जगज्जेता
आतापर्यंत केवळ वेस्ट इंडिज, भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका या पाचच संघांना वर्ल्ड कप जिंकता आलेला आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने तब्बल पाचवेळा तर वेस्ट इंडिज आणि भारताने प्रत्येकी दोन वेळा जेतेपद पटकावले आहे. तर पाकिस्तान आणि श्रीलंकेने प्रत्येकी एक वेळा एकदा वर्ल्ड कप जिंकला आहे. मात्र या वर्ल्ड कप स्पर्धेत माजी विश्वविजेत्यांपैकी कुठलाही संघ अंतिम फेरीत पोहोचला नसल्याने क्रिकेटला इंग्लंड किंवा न्यूझीलंडच्या रूपात सहावा विश्वविजेता मिळणार आहे. 

Web Title: ICC World Cup 2019 : Jason Roy free to play World Cup final? England star fined 30% match fee, receives demerit points for dissent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.