ICC World Cup 2019 : टीम इंडियाच्या 'जबरा फॅन' आज्जीबाई दिसणार जाहिरातीत!

ICC World Cup 2019: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने बाजी मारली खरी, पण या लढतीत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले ते 87 वर्षीय चारुलता पटेल या आज्जीबाईंनी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 11:57 IST2019-07-05T11:56:44+5:302019-07-05T11:57:20+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC World Cup 2019: 87 year old cricket loving granny Charulata Patel to be the face of a Pepsi ad campaign | ICC World Cup 2019 : टीम इंडियाच्या 'जबरा फॅन' आज्जीबाई दिसणार जाहिरातीत!

ICC World Cup 2019 : टीम इंडियाच्या 'जबरा फॅन' आज्जीबाई दिसणार जाहिरातीत!

बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने बाजी मारली खरी, पण या लढतीत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले ते 87 वर्षीय चारुलता पटेल या आज्जीबाईंनी. या आज्जीबाई व्हिलचेअरवरून सामना पाहायला आल्या होत्या. सामना संपल्यावर या आज्जीबाईंची कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी स्पेशल भेट घेतली. यावेळी आज्जीबाईंनी या दोघांनाही आर्शिवादही दिले. पण या आज्जीबाईंसाठी आता एक खूशखबर आहे. पेप्सिको कंपनीनं त्यांच्या 'स्वॅग' मोहिमेत आज्जीबाईंना घेऊन एक जाहीरात बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पेप्सिकोची प्रतिस्पर्धी कोका कोला हे आयसासी वर्ल्ड कप स्पर्धेचे ग्लोबल स्पॉन्सर्स आहेत. त्यांनी आयसीसीसोबत पुढील पाच वर्षांसाठी जवळपास 300 कोटी रुपयांचा करार केला आहे. पेप्सिकोसह बियॉन्स आणि प्रियांका चोप्रा सारखे सेलेब्रिटी आहेत. आता चारुलता यांना पेप्सिको स्वॅग स्टार म्हणून समोर आणतील. पेप्सिकोच्या प्रवक्त्याने सांगितले की,''चारुलता पटेल यांची गोष्ट लोकांसमोर आणण्यात आम्हाला अभिमान वाटत आहे. या वयातही त्यांचे क्रिकेटप्रती असलेले प्रेम जगासमोर आणायला हवं. आयुष्य सुंदर आहे, ते तसे जगायला हवं.''

ज्जीबाईंचा 'आनंद' होणार द्विगुणित; कारण विश्वचषकाचे मिळणार फुकट तिकीट
चारुलता ज्या भारताच्या विश्वचषकातील लढती पाहणार आहेत, त्या तिकीटांचे पैसे त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचा 'आनंद' द्विगुणित होणार असून आता त्यांना सामन्याचे तिकीट फुकटच मिळणार आहे.  आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक घोषणा केली आहे. आपल्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, " चारुलता यांना इंग्लंडमध्ये शोधा. कारण यापुढे विश्वचषकात भारताचे जे सामने होतील, त्या सामन्यांच्या तिकिटांचे पैसे मी त्यांना देणार आहे."

सामनावीर रोहित शर्माने केला 'सुपर फॅन'बरोबर आनंद साजरा
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शतक झळकावले. विश्वचषकातील त्याचे हे चौथे शतक ठरले. भारताच्या विजयात रोहितने मोलाचा वाटा उचलला आणि त्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. रोहितने आपला आनंद यावेळी स्पेशल फॅन'बरोबर साजरा केला.
 

 

Web Title: ICC World Cup 2019: 87 year old cricket loving granny Charulata Patel to be the face of a Pepsi ad campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.