मी धोनीला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले असते, म्हणतोय मास्टर-ब्लास्टर...

भारताची या सामन्यातील परिस्थिती पाहिली तर ती धोनी सांभाळू शकला असता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 09:55 PM2019-07-16T21:55:10+5:302019-07-16T21:56:22+5:30

whatsapp join usJoin us
I would have sent MS Dhoni to number five batting, say master-blaster Sachin Tendulkar | मी धोनीला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले असते, म्हणतोय मास्टर-ब्लास्टर...

मी धोनीला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले असते, म्हणतोय मास्टर-ब्लास्टर...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. या सामन्यात भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले आणि त्यामुळेच भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका झाली. आता तर भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही धोनीच्या फलंदाजीच्या स्थानावर टीका केली आहे.

याबाबत सचिन म्हणाला की, " भारताची या सामन्यातील परिस्थिती पाहिली तर ती धोनी सांभाळू शकला असता. त्यामुळे मी कधीच धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवले नसते. मी हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांच्याऐवजी धोनीला पुढे फलंदाजीसाठी पाठवले असते. मी जर संघात असतो तर त्याला मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले असते."

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अजून एक सुपर ओव्हर खेळवायला हवी होती, सांगतोय सचिन तेंडुलकर
विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना टाय झाला होता. त्यानंतर खेळवण्यात येणारी सुपर ओव्हरही टाय झाली होती. त्यावेळी इंग्लंडच्या संघाला चौकारांच्या जोरावर विजयी ठरवण्यात आले. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. पण आयसीसीचा हा नियम महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मात्र पटलेला नाही.

तेंडुलकरने '100एमबी'शी बोलताना सांगितले की, " विश्वचषकाची अंतिम फेरी ही फार प्रतिष्ठेची असते. त्यामुळे या सामन्याचा निकाल चौकारांच्या जोराव लावला जाणे चुकीचे आहे. जर एक सुपर ओव्हर टाय होते तर त्यानंतर दुसरी सुपर ओव्हर खेळवायला हवी होती. फुटबॉलमध्ये जसा सामना टाय झाल्यावर अतिरीक्त वेळ दिला जातो, तसे क्रिकेटमध्येही व्हायला हवे."

सचिन तेंडुलकरने दिली आपल्या गुरुंना मानवंदना, शेअर केला खास फोटो
मुंबई : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या गुरुंना मानवंदना दिली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. हे औचित्य साधून सचिनने आपल्या गुरुंचे स्मरण केले आहे. सचिन सध्या भारतामध्ये नसल्याचे म्हटले जात आहे. कारण सचिन इंग्लंडमध्ये विश्वचषकासाठी गेला होता. सचिनने विश्वचषकात समालोचनही केले होते. त्याचबरोबर विश्वचषकाच्या अंतिम फेरीनंतर खेळाडूंना सचिनच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता.

सचिन मुंबईत नसला आणि फार मोठा सन्मान त्याला विश्वचषकात मिळाला असला तरी सचिन आपल्या गुरुंना विसरला नाही. सचिन महान क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला आला. पण त्याला क्रिकेटचे धडे दिले ते रमाकांत आचरेकर यांनी. काही महिन्यांपूर्वी आचरेकर यांचे निधन झाले होते. त्यावेळी सचिनही त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होता. पण आचरेकर सर या जगात नसतानाही त्यांची आठवण सचिनने आजच्या खास दिवशी काढली आहे. सचिनने एक ट्विट केले असून यामध्ये त्याने आचरेकर सरांबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे.

Web Title: I would have sent MS Dhoni to number five batting, say master-blaster Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.