सचिनच्या महानतेला वाडेकर यांचेच कोंदण

सचिन भारताचा महान फलंदाज झाला. बरेच विश्वविक्रम त्याने रचले. पण सचिनच्या महानतेला कोंदण चढवले ते अजित वाडेकर यांनीच. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 06:03 AM2018-08-16T06:03:56+5:302018-08-16T06:04:12+5:30

whatsapp join usJoin us
The greatness of Sachin Tendulkar's fame is that of Wadekar | सचिनच्या महानतेला वाडेकर यांचेच कोंदण

सचिनच्या महानतेला वाडेकर यांचेच कोंदण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - सचिन भारताचा महान फलंदाज झाला. बरेच विश्वविक्रम त्याने रचले. पण सचिनच्या महानतेला कोंदण चढवले ते अजित वाडेकर यांनीच. 
भारतीय संघ परदेश दौऱ्यावर होता. चेंडू चांगलेच स्विंग होत होते. त्यामध्ये भारताचे फलंदाज सुमार कामगिरी करत होते. दुष्काळात तेरावा महिना म्हणून भारताचा सलामीवीर जायबंदी झाला होता. सामना काही तासांवर येऊन ठेपला होता. सलामीला कोणाला उतरवायचे हा यक्षप्रश्न वाडेकर यांच्यापुढे होता, कारण ते भारतीय संघाचे व्यवस्थापक होते.
सचिनची फलंदाजी त्यांनी पहिली होती. मुंबईचे खेळाडू खडूस असतात, हे पण त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी सचिनला बोलावले. त्याला सांगितले, " हे बघ सचिन आपला सलामीवीर जायबंदी आहे, हे तुला माहितीच आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल तर मला तुझी मदत लागेल. तू स्लामीला यावं, असं मला वाटतं." सचिनने सर्व ऐकून घेतलं आणि म्हणाला, " वाडेकर सर, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना, मग मी ही जबाबदारी पार पाडेन. आऊट व्हायला एकचं चेंडू पुरेसा असतो आणि तो टाळायचा असतो, असं तुम्हीच म्हणाला होतात, मी तेच करेन."
सचिन तेव्हापासून सलामी करायला लागला आणि त्यानंतर सचिनने मागे वळून पहिलेच नाही. सलामीला आल्यापासून सचिनच्या धावा होत गेल्या, तो एकामागून एक विक्रम रचायला लागला, याचे श्रेय वाडेकर यांनाही द्यायला हवेच.

Web Title: The greatness of Sachin Tendulkar's fame is that of Wadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.