२१ धावांत ३ विकेट्स तरीही जसप्रीत बुमराह दुर्लक्षित! MI कडून दुसऱ्या गोलंदाजाचे कौतुक, Video 

मुंबई इंडियन्सने काल IPL 2024 च्या मोसमातील तिसऱ्या विजयाची नोंद करताना पंजाब किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 05:13 PM2024-04-19T17:13:54+5:302024-04-19T17:14:14+5:30

whatsapp join usJoin us
Gerald Coetzee delivered the complete package during PBKSvMI, get special award from Mumbai Indians, franchise ignore Jasprit Bumrah | २१ धावांत ३ विकेट्स तरीही जसप्रीत बुमराह दुर्लक्षित! MI कडून दुसऱ्या गोलंदाजाचे कौतुक, Video 

२१ धावांत ३ विकेट्स तरीही जसप्रीत बुमराह दुर्लक्षित! MI कडून दुसऱ्या गोलंदाजाचे कौतुक, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PBKS vs MI: मुंबई इंडियन्सने काल IPL 2024 च्या मोसमातील तिसऱ्या विजयाची नोंद करताना पंजाब किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. अटीतटीच्या सामन्यात मुंबईने ९ धावांनी बाजी मारली. यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रसन्न वातावरण पाहायला मिळाले. या सामन्यात जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) ४ षटकांत २१ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या आणि त्याला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविले गेले. 

मुंबई इंडियन्सचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! Hardik Pandyaवर संघातील खेळाडूची जाहीर टीका?

पण,  सामना जिंकल्यानंतर मुंबईचे प्रशिक्षक मार्क बाऊचर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला बॅच देतात. हा बॅच  देण्याची वेळ आली तेव्हा, तो जसप्रीतला दिला गेला नाही. तर ४ षटकांत ३२ धावांत तीन विकेट्स घेणाऱ्या गेराल्ड कोएत्झीला देण्यात आला. याप्रसंगी बुमराहला टाळ्या वाजवताना पाहून चाहते काहीसे नाराज झाले. मुंबईच्या ड्रेसिंग रूमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


जसप्रीत बुमराह आणि कोएत्झी यांनी मिळून पंजाबला सुरुवातीला धक्के देताना त्यांची अवस्था ४ बाद १४ धावा अशी केली होती.  त्यानंतरही दोघांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.  


मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव ( ७८), रोहित शर्मा ( ३६) व तिलक वर्मा ( ३४) यांच्या फटकेबाजीच्या दोरावर ७ बाद १९२ धावांचा डोंगर उभा केला. पंजाब किंग्सने १४ धावांत ४ विकेट्स गमावल्या. जसप्रीत बुमराह व गेराल्ड कोएत्झी यांनी सुरुवातीला हे धक्के दिले. त्यानंतर ६ बाद ७७ वरून शशांक सिंग व हरप्रीत भाटीया यांनी पंजाबला सावरण्याचा प्रयत्न केला.

शशांक व आशुतोष शर्मा हे पुन्हा एकदा पंजाबचे संकटमोचक बनले. बुमराहने शशांकला ( ४१) माघारी पाठवले, पण आशुतोष व हरप्रीत ब्रार उभे राहिले. आशुतोषने २८ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६१ धावा चोपल्या, तर हरप्रीतने २१ धावांचे योगदान दिले. शेवटच्या काही षटकात पंजाबने विकेट्स गमावल्या आणि सामना हातून निसटला. पंजाबचा संपूर्ण संघ १९.१ षटकांत १८३ धावांवर तंबूत परतला.  

Web Title: Gerald Coetzee delivered the complete package during PBKSvMI, get special award from Mumbai Indians, franchise ignore Jasprit Bumrah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.