17 चेंडूंत अर्धशतक अन् पुढील 8 चेंडूंत शतकोत्सव, ट्वेंटी-20 मध्ये भीमपराक्रम

भारतात इंडियन प्रीमिअर लीगचा ज्वर वाढत असताना स्कॉटलंडमध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एका फलंदाजाने भीमपराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 05:20 PM2019-04-23T17:20:58+5:302019-04-23T17:21:33+5:30

whatsapp join usJoin us
George Munsey blasts epic 25-ball hundred for Gloucestershire 2nd XI | 17 चेंडूंत अर्धशतक अन् पुढील 8 चेंडूंत शतकोत्सव, ट्वेंटी-20 मध्ये भीमपराक्रम

17 चेंडूंत अर्धशतक अन् पुढील 8 चेंडूंत शतकोत्सव, ट्वेंटी-20 मध्ये भीमपराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

स्कॉटलंड : भारतात इंडियन प्रीमिअर लीगचा ज्वर वाढत असताना स्कॉटलंडमध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एका फलंदाजाने भीमपराक्रम केला. स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्सीने 17 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि पुढील 8 चेंडूंत त्याने त्याचे शतकात रुपांतर केले. येथे सुरु असलेल्या अनधिकृत ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत ग्लोसेंस्टरशायर 2nd एकादश आणि बाथ सीसी या संघांमध्ये सामना खेळवण्यात आला होता. त्यात मुन्सीने 39 चेंडूंत 147 धावांची वादळी खेळी केली. 


ग्लोसेंस्टरशायर 2nd एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुन्सीने जीपी विलोवसह 53 चेंडूंत शतकी भागीदारी केली. विलोवने 35 चेंडूंत नाबाद 72 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या टॉम प्राइसनेही 23 चेंडूंत 50 धावा चोपल्या आणि ग्लोसेंस्टरशायर संघाला 20 षटकांत 3 बाद 326 धावा केल्या.  



ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नाववर आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी नाबाद 175 धावा चोपल्या होत्या आणि संघाने 5 बाद 263 धावांपर्यंत मजल मारली होती. अफगाणिस्तान संघाने ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम धावांचा विक्रम मोडताना आयर्लंडविरुद्ध 3 बाद 278 धावा केल्या. त्यात हझरतुल्लाह झझाईसच्या नाबाद 162 धावांचा समावेश होता.

स्कॉटलंडच्या फलंदाजाने चौकार - षटकारांची आतषबाजी केली. त्याने 5 चौकार व 20 षटकार ठोकले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये जलद शतकाचा विक्रम गेलच्या नावावर आहे, परंतु मुन्सीने पाच चेंडू कमी खेळून शतक ठोकले आणि गेलला मागे टाकले. मुन्सीच्या संघाने हा सामना 112 धावांनी जिंकला. 


 

Web Title: George Munsey blasts epic 25-ball hundred for Gloucestershire 2nd XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.