IPL Auction 2018 : अखेर ख्रिस गेलला बोली लागली, या संघानं केलं खरेदी

वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज गेलला बेस प्राइजमध्ये खरेदी केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 04:15 PM2018-01-28T16:15:21+5:302018-01-28T17:46:49+5:30

whatsapp join usJoin us
Eventually Chris Gayle got the quote, this team bought it | IPL Auction 2018 : अखेर ख्रिस गेलला बोली लागली, या संघानं केलं खरेदी

IPL Auction 2018 : अखेर ख्रिस गेलला बोली लागली, या संघानं केलं खरेदी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू -  आयपीएलच्या 11 व्या सत्रासाठी बंगळुरुमध्ये लिलाव सुरु आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज गेलला अखेर बोली लागली आहे. दोनवेळा गेलला लिलावात नाव घोषित करुन कोणत्याही संघानं खरेदी केलं नव्हतं, पण लिलावाच्या अंतिम चरणात पुन्हा एकदा गेलला लिलावत उतरवण्यात आलं. आणि तिसऱ्यावेळी गेलला पंजाबनं खरेदी केलं. पंजाबनं गेलला दोन कोटींच्या बेस प्राइजमध्ये खरेदी केलं आहे. त्यामुळं आता तो पंजाबकडून खेळणार आहे. गेलच्या नावावर आयपीएलमध्ये पाच शतके आहेत. पण आयपीएलचे दहावे सत्र त्याच्यासाठी चांगलं गेल नव्हते. त्यामुळं या आयएलमध्ये त्याला खरेदीदार मिळत नव्हता.  दुसरीकडे मुरली विजयला चेन्नईनं खरेदी केलं. तर पार्थिव पटेलसाठी मुंबई आणि आरसीबीमध्ये चुरस लागली होती. पण शेवटी आरसीबीनं त्याला खरेदी करत दिलासा दिला. ऑफ्रिकेच्या स्नगनलाही आज खरेदीदार मिळाला नाही.  

आयपीएलच्या दहाव्या सत्रात गेलला आपली कमाल दाखवता आली नव्हती. त्यानं केवळ एकाच सामन्यांमध्ये जोरदार फटकेबाजी केली होती. खराब परफॉर्मन्समुळे त्याला काही मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरही बसावं लागलं होतं. याचाच परिणाम आज झालेल्या लिलावात पाहायला मिळाला. दहाव्या आयपीएलमध्ये आरसीबीने गेलला दहा सामन्यात अंतिम 11 मध्ये संधी दिली होती. मात्र, गेलने दहा सामन्यात फक्त 200 धावा काढल्या होत्या, तो पूर्णपणे अपयशी ठरला, आयपीएलमध्ये गेलने 101 सामन्यात 3626 धावा कुटल्या  आहेत. आज गेलबरोबरच इंग्लडचा कर्णधार रूटवरही कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे हे दोघे उद्या पुन्हा लिलावात उपलब्ध राहणार आहेत.

काल बोली न लागलेल्या खेळाडूंवर आज पुन्हा एकदा बोली लागली. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीललाही कोणी खरेदीदार मिळाला नाही. तर मुरली विजयला चेन्नईनं दोन कोटींमध्ये खरेदी केलं. सॅम बिल्गींज एक कोटींच्या बोलीवर चेन्नईच्या ताफ्यात.  

Web Title: Eventually Chris Gayle got the quote, this team bought it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.