CSK vs SRH IPL 2018 LIVE: 'KS Ss L' battle for captains, Chennai to make 'play-off' | CSK v SRH IPL 2018 : अंबाती रायुडूचा भव्य 'शतकोत्सव', चेन्नईचा 'विजयोत्सव'
CSK v SRH IPL 2018 : अंबाती रायुडूचा भव्य 'शतकोत्सव', चेन्नईचा 'विजयोत्सव'


आकाश नेवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अंबाती रायुडू (६२ चेंडूंत १०० धावा) याने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादने दिलेले १८० धावांचे आव्हान आठ गडी आणि सहा चेंडू राखून पूर्ण केले.
सनरायझर्सने २० षटकांत ४ बाद १७९ धावा केल्या. हे लक्ष्य चेन्नईने सहज पूर्ण करत आपला प्ले आॅफ प्रवेशाचा मार्ग आणखी सुकर केला. येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या डावाची सुरुवात झक्कास झाली. शेन वॉटसन (५७ धावा) आणि अंबाती रायुडू यांनी १३४ धावांची दमदार सलामी दिली. वॉटसनने ३१ चेंडंूतच आपले अर्धशतक पूर्ण केले. रायुडू याने कर्णधार धोनीसह नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. रायुडू याने ७ चौकार आणि ७ षटकार लगावले.
तत्पूर्वी सनरायझर्सचा सलामीवीर अ‍ॅरलेक्स हेल्स (२ धावा) हा लगेचच तंबूत परतला. शिखर धवन (४९ चेंडंूत ७९ धावा) याने कर्णधार केन विल्यम्सन याच्या साथीने डावाला आकार दिला. धवन आणि विल्यम्सन यांनी १२३ धावांची भागिदारी केली. धवन याने आपल्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकार लगावले, तर केन विल्यम्सन याने ३९ चेंडंूत ५१ धावा केल्या. आयपीएल लिलावामध्ये महागडा ठरलेल्या मनीष पांडेचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. दीपक हुड्डा याने ११ चेंडंूत २१ धावांची खेळी करत मोठी धावसंख्या उभारून दिली. दीपक चहार याने चेन्नईकडून फायदेशीर गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत १६ धावा देत एक गडी बाद केला, तर शार्दूल ठाकूरने २, तर ब्रावोने एक गडी बाद केला. 

अंबाती रायुडूचं शतक हे या आयपीएलमधील चौथं शतक ठरलं. याआधी ख्रिस गेल, शेन वॉटसन आणि ऋषभ पंत यांनी शतकी खेळी केली होती. 

हैदराबाद वि. चेन्नई सामन्याचा संपूर्ण वृत्तांत.... 

7.31 : चेन्नई सुपरकिंग्सचा हैदराबादवर आठ विकेट्सनी मोठा विजय... प्ले-ऑफमधील प्रवेश जवळजवळ निश्चित... 

7. 28 : अंबाती रायुडूचं तडाखेबंद शतक... ६२ चेंडूत १०० धावा पूर्ण...  रायुडूचा आयपीएलमधील पहिलाच 'शतकोत्सव'

7.22 ः चेन्नईचं विजयाकडे कूच... १८ षटकांनंतर २ बाद १७२ धावा... 

7.15 : अंबाती रायुडूचं धुमशान... १६ ओव्हरनंतर चेन्नई २ बाद १५७

7.09 : १५ ओव्हरनंतर चेन्नई २ बाद १४३

7.04 : सुरेश रैना 'फ्लॉप', अवघ्या दोन धावा करून तंबूत...

6.59 : चेन्नईला पहिला धक्का, शेन वॉटसन ५७ धावांवर' रन-आउट' 

6.57 : १३ षटकांनंतर चेन्नईच्या बिनबाद १२८ धावा...

6.49 : ११ षटकांनंतर चेन्नईच्या बिनबाद १०६ धावा... हैदराबादच्या गोलंदाजांना सूर सापडेना...

6.47 : अंबाती रायुडूचंही अर्धशतक... षटकार ठोकून गाठला ५० धावांचा टप्पा....

6.45 : चेन्नई १० षटकांनंतर बिनबाद ९३ 

6.44 : वॉटसनचं अर्धशतक पूर्ण... ३१ चेंडूत ५० धावा...

6.38 : नऊ षटकांनंतर चेन्नईच्या बिनबाद ८३ धावा... वॉटसन ४१ (२६ चेंडू) आणि रायुडू ४२ (२८ चेंडू) धावांवर...

6.32 : आठ षटकांनंतर चेन्नईच्या बिनबाद ७७ धावा... 

6.25 : चेन्नईचं अर्धशतक पूर्ण... सहा षटकांनंतर बिनबाद ५३ धावा...

6.22 : शेन वॉटसन - अंबाती रायुडूची जोडी जमली, पाच षटकांनंतर चेन्नई बिनबाद ४३

6.14 : तीन षटकांनंतर चेन्नई बिनबाद २८

6.06 : पहिल्या षटकात चेन्नईच्या बिनबाद ७ धावा

5.50 : दीपक हुडाच्या ११ चेंडूतील २१ धावा निर्णायक ठरण्याची शक्यता...

5.49 : हैदराबादचं चेन्नईपुढे १८० धावांचं आव्हान... शेवटच्या चार षटकांमध्ये धावगती पुन्हा मंदावल्यानं हैदराबादची मजल १७९ धावांपर्यंत...

5.42 : १९ ओव्हरनंतर हैदराबादच्या ४ बाद १७१ धावा... 

5.37 : हैदराबादची चौकडी तंबूत... मनीष पांडे ५ धावांवर बाद... हैदराबाद ४ बाद १६०

5.34 : १८ ओव्हरनंतर हैदराबादच्या ३ बाद १५८ धावा... 

5.28 : १७ ओव्हरनंतर हैदराबादच्या ३ बाद १४९ धावा...

5.24 : केन विल्यमसन ५१ धावांवर बाद, शार्दुलच्या गोलंदाजीवर ब्राव्होनं टिपला अफलातून झेल

5.19 : धुलाई करून धवन माघारी, हैदराबादला दुसरा धक्का... ४९ चेंडूत ७९ धावांची खेळी... ब्राव्होच्या 'स्लोअर वन'ने चकवलं

5.15 : केन विल्यमसनचं अर्धशतक... शिखर धवन ७४ धावांवर

5.13 : १५व्या षटकात १४ धावा... हैदराबाद १ बाद १३०... 

5.08 : हैदराबाद - १४ षटकांनंतर १ बाद ११६

5.03 : शिखर धवनचं आयपीएलमधील ३१ वं अर्धशतक साजरं

5.01 : धवन-विल्यमसनने गिअर बदलला, १२ षटकांनतर १ बाद ८९ धावा

4.51 : हैदराबादची टुकूटुकू फलंदाजी... १० ओव्हरनंतर १ बाद ६२ धावा

4.38 : आठ षटकांनंतर हैदराबादच्या एक बाद ४९ धावा... चेन्नईचा टिच्चून मारा... 

4. 32 : आयपीएल २०१८ मध्ये केन विल्यमसनच्या ५०० धावा पूर्ण

4.28 : हैदराबादचे 'आस्ते कदम'... सहा ओव्हरनंतर १ बाद २९ धावा... 

4.15 : हैदराबादला पहिला धक्का, हेल्स दोन धावांवर माघारी... 

4.12 : तीन ओव्हरनंतर हैदराबादच्या बिनबाद १६ धावा... त्यापैकी १५ धावा शिखर धवनच्याच... 

4.00 ः हैदराबादचे सलामीवीर शिखर धवन - अलेक्स हेल्स मैदानात... सामना सुरू... 

3.40 : राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवानंतर विजयाच्या ट्रॅकवर परतण्यास चेन्नई उत्सुक

3.35 : या आधीच्या सामन्यात दिल्लीनं दिलेलं १८८ धावांचं आव्हान पार करून हैदराबादनं साकारला होता विजय

3.32 : चेन्नई सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकली; प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय 


Web Title: CSK vs SRH IPL 2018 LIVE: 'KS Ss L' battle for captains, Chennai to make 'play-off'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.