CSK vs DD, IPL 2018 : चेन्नई अव्वल स्थानी; दिल्लीवर 13 धावांनी विजय

अटीतटीच्या झालेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 13 धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 07:45 PM2018-04-30T19:45:40+5:302018-04-30T23:48:04+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs DD, IPL 2018 LIVE: Dhoni changes four changes made in Chennai team, Lugei Ngigid to play first match today | CSK vs DD, IPL 2018 : चेन्नई अव्वल स्थानी; दिल्लीवर 13 धावांनी विजय

CSK vs DD, IPL 2018 : चेन्नई अव्वल स्थानी; दिल्लीवर 13 धावांनी विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देधोनीने फक्त 22 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीन नाबाद 51 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

चेन्नई अव्वल स्थानी; दिल्लीवर 13 धावांनी विजय
पुणे : अटीतटीच्या झालेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 13 धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात आश्वासक झाली नाही. त्यांनी आपले बिनीचे चार फलंदाज 74 धावांत गमावले. पण त्यानंतर रीषभ पंतने तुफानी फटकेबाजी केली. पंतने 45 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 79 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पंत बाद झाल्यावर विजय शंकरने संघाच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यामध्ये तो अपयशी ठरला. शंकरने 31 चेंडूंत एक चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद 51 धावा फटकावल्या.

सलामीवीर शेन वॉटसन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी 211 धावांचा डोंगर उभारला. वॉटसनने 40 चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 78 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. धोनीने फक्त 22 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
 

11.34 PM : चेन्नईचा दिल्लीवर 13 धावांनी विजय

11.30 PM : विजय शंकरचे षटकारासह अर्धशतक

11.27 PM :  दिल्लीला विजयासाठी सहा चेंडूंत 28 धावांची गरज

11.20 pM : दिल्लीला मोठा धक्का; रीषभ पंत बाद

- दिल्लीच्या विजयाची आशा असलेला रीषभ पंत अठराव्या षटकात बाद झाला. पंतने 45 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 79 धावांची खेळी साकारली.

11.08 PM :  चौकारासह रीषभ पंतचे अर्धशतक पूर्ण

- सोळाव्या षटकात चौकार लगावत रीषभ पंतने आपले अर्धशतक पूर्ण केले.

11.00 PM : दिल्ली 15 षटकांत 4 बाद 128

- रीषभ पंत आणि विजय शंकर यांनी संघाला स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे दिल्लीने 15 षटकांत 128 धावा केल्या.

10.50 PM : तेराव्या षटकात दिल्लीचे शतक पूर्ण

10.42 PM : दिल्ली 10 षटकांत 4 बाद 78

- रीषभ पंतने दिल्लीची बाजू सावरत संघाला दहा षटकांमध्ये 78 धावांपर्यंत पोहोचवले. 

10.35 PM : ग्लेन मॅक्सवेल बाद; दिल्लीचा चौथा धक्का

- रवींद्र जडेजाने मॅक्सवेलला त्रिफळाचीत करत दिल्लीला चौथा धक्का दिला.

10.29 PM : दिल्लीला मोठा धक्का; कर्णधार श्रेयस अय्यर बाद

- सातव्या षटकात धावचीत होत श्रेयस अय्यरने आत्मघात केला. श्रेयसला एका चौकाराच्या मदतीने 13 धावा करता आल्या.

10.22 PM : कॉलिन मुर्नो बाद; दिल्लीला दुसरा धक्का

- दिल्लीचा सलामीवीर मुर्नो दमदार फटकेबाजी करत होता, पण केएम आसिफने त्याला बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. मुर्नोने 16 चेंडूंत 26 धावा केल्या.

10.03 PM : दिल्लीला पहिला धक्का; पृथ्वी शॉ बाद

- पृथ्वी शॉ याला केएम आसिफने बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वीला 9 धावांवर समाधान मानावे लागले.

धोनी आणि वॉटसनची तुफानी फटकेबाजी; चेन्नईचा 211 धावांचा डोंगर
पुणे : सलामीवीर शेन वॉटसन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी 211 धावांचा डोंगर उभारला. चेन्नईला दिल्ली डेअसडेव्हिलिअर्सविरुद्धच्या सामन्यात वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी दमदार फलंदाजी करत 102 धावांची सलामी दिली. वॉटसनने 40 चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 78 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. वॉटसन बाद झाल्यावर धोनीने दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे काढायला सुरुवात केली. अव्हेश खानच्या 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कॉलिन मुर्नोने झेल सोडत जीवदान दिले, धोनी त्यावेळी 31 धावांवर होता. त्यानंतरही धोनीने फटकेबाजीला मुरड घातली नाही. धोनीने फक्त 22 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीन नाबाद 51 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

 

9.41 PM : चेन्नईचे दिल्लीपुढे 212 धावांचे आव्हान

9.38 PM : चौकारासह धोनीचे अर्धशतक पूर्ण

9.37 PM : धोनीच्या षटकारासह चेन्नईच्या दोनशे धावा पूर्ण

9.32 PM : धोनीला31 धावांवर जीवदान

- अव्हेश खानच्या 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कॉलिन मुर्नोने झेल सोडत जीवदान दिले, धोनी त्यावेळी 31 धावांवर होता.

9.28 PM : षटकारासह धोनी आणि रायुडू यांची चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

9.22 PM : महेंद्रसिंग धोनीचे सलग दोन षटकार

- ट्रेंट बोल्टच्या सतराव्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर धोनीने दोन षटकार लगावले. त्यानंतरच्या तिसऱ्या चेंडूवरही धोनीने चौकार वसूल केला. या षटकात चेन्नईने तब्बल 21 धावा लूटल्या.

9.14 PM : चेन्नई 15 षटकांत 3 बाद 137

9.05 PM : चेन्नईला मोठा धक्का; शेन वॉटसन बाद

- अमित मिश्राने शेन वॉटसनला बाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला. वॉटसनने 40 चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 78 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

8.52 PM : चेन्नईला दुसरा धक्का, सुरेश रैना बाद

- चेन्नईला बाराव्या षटकात सुरेश रैनाच्या रुपात दुसरा धक्का बसला. दिल्लीच्या ग्लेन मॅक्सवेलने रैनाला एका धावेवर असताना त्रिफळाचीत केले.

8.49 PM : चेन्नईला पहिला धक्का, फॅफ ड्यू प्लेसिस बाद

- विजय शंकरने अकराव्या षटकात फॅफ ड्यू प्लेसिसला त्रिफळाचीत करत चेन्नईला पहिला धक्का दिला. फॅफने चीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 33 धावा केल्या.

8.33 PM : चेन्नई 10 षटकांत बिनबाद 96

8.34 PM : षटकारासह शेन वॉटसनचे दिमाखात अर्धशतक

- राहुल टेवाटियाच्या नवव्या षटकाच्या पहिल्यचा चेंडूवर षटकार लगावत वॉटसनने 25 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

8.20 PM : चेन्नईची पाच षटकात बिनबाद 45 अशी मजल

- पाचव्या षटकात चेन्नईच्या सलामीवीरांनी तब्बल 20 धावांची लूट केली. त्यामुळे चेन्नईला पाच षटकांमध्ये 45 धावा करता आल्या.

8.00 PM : शेन वॉटसनने चौकाराने केली चेन्नईच्या डावाची सुरुवात

- दुसऱ्याच चेंडूवर वॉटसनने चौकार लगावत संघाला दमदार सुरुवात करून दिली.

7.40 : धोनीने चेन्नईच्या संघात केले चार बदल, लुंगी एनगिडी आज पहिला सामना खेळणार

7.30 PM : दिल्लीने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारले

 



 

 

अव्वल स्थान पटकावण्याचे चेन्नईचे लक्ष्य;  दिल्लीविरुद्ध आज सामना

पुणे : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ सध्याच्या घडीला दुसऱ्या स्थानावर आहे, तर दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ तळाला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून अव्वल स्थान पटकावण्याचे चेन्नईचे लक्ष्य असेल. दुसरीकडे श्रेयस अय्यरने संघाची कमान सांभाळल्यावर पहिल्याच सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्लीचे आव्हान अजूनही कायम आहे. पण त्यांना बाद फेरीत पोहोचण्यासाठी जवळपास सर्वच सामने जिंकावे लागतील. त्यामुळे चेन्नईला पराभूत करत आयपीएलमध्ये आपली दखल घ्यावी, असे दिल्लीला वाटत असेल तर त्यांना हा सामना जिंकावाच लागेल.

 

दोन्ही संघ

 



 

 


Web Title: CSK vs DD, IPL 2018 LIVE: Dhoni changes four changes made in Chennai team, Lugei Ngigid to play first match today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.