आयपीएलपूर्वी परतलं गेल वादळ, टी-२० मध्ये केला नवा विक्रम

पुढच्या वर्षी आयपीएल सामने सुरु होणार आहे. लिलावापूर्वीच गेलनं आपल्या धाकड फलंदाजीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 07:15 AM2017-12-09T07:15:44+5:302017-12-09T07:16:47+5:30

whatsapp join usJoin us
chris gayle storm back before IPL, banana new record in T20 | आयपीएलपूर्वी परतलं गेल वादळ, टी-२० मध्ये केला नवा विक्रम

आयपीएलपूर्वी परतलं गेल वादळ, टी-२० मध्ये केला नवा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल क्रिकेटचे सर्वांत लहान स्वरूप टी-२० क्रिकेटमध्ये ८०० षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. पुढच्या वर्षी आयपीएल सामने सुरु होणार आहे. लिलावापूर्वीच गेलनं आपल्या धाकड फलंदाजीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

विंडीजच्या या डावखु-या फलंदाजाने बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये ढाका येथे खेळल्या गेलेल्या लढतीत रंगपूर रायडर्सतर्फे नाबाद १२६ धावांची खेळी करताना त्यानं टी-20 मध्ये 800 षटकार पूर्ण करण्याचा पराक्रम केला. त्याने ५१ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व १४ षटकार लगावले. गेलच्या नावावर आता ३१८ टी-२० सामन्यांत ८०१ षटकारांची नोंद आहे. त्यात १०३ षटकार त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत लगावले आहेत.

टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणा-या फलंदाजांच्या यादीत गेलनंतर वेस्ट इंडिजचाच किरोन पोलार्ड (५०६), न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम (४०८), वेस्ट इंडिजचा ड्वेन स्मिथ (३५१) आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (३१४) यांचा क्रमांक येतो. गेलने टी-२० मध्ये वैयक्तिक १९ वे शतकही झळकावले. गेलच्या खेळीच्या जोरावर रायडर्सने या एलिमिनेटर लढतीत खुलना टायटन्सचा ८ गडी राखून पराभव केला.

हे केले विक्रम - 

  • ख्रिस गेलचे हे ट्वेंटी-20 प्रकारातील 19वे शतक आहे. ट्वेंटी-20 प्रकारात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो अव्वल असून दुसऱ्या क्रमांकावर तीन खेळाडू असून त्यांनी प्रत्येकी 7 शतके केली आहेत.
  • ख्रिस गेलने आजपर्यत ट्वेंटी-20 प्रकारात 19 शतके केली असून त्यातील हे तिसरे वेगवान शतक होते.
  • ख्रिस गेलने आजच्या सामन्यात तब्बल 14 षटकार खेचले आहेत.
  • ख्रिस गेलने आज ट्वेंटी-20 प्रकारात वैयक्तिक 801 षटकारांचा टप्पा पार केला.
  • 2011 पासून गेलने प्रत्येक वर्षी ट्वेंटी-20 प्रकारात एकतरी शतकी खेळी केली आहे.
  • ट्वेंटी-20 प्रकारात एका सामन्यात 10 पेक्षा जास्त षटकार गेलने 14व्यांदा मारले आहे. दुसऱ्या क्रमांकावर 3 खेळाडू असून त्यांनी दोनवेळा अशी कामगिरी केली आहे.
  • गेलने कसोटीपेक्षा (15) ट्वेंटी-20 प्रकारात(19) जास्त शतकी खेळी केल्या आहेत.
  • ट्वेंटी-20 प्रकारात बाद फेरीत गेलने केलेल्या नाबाद 126 ह्या सर्वोच्च धावा आहेत.
  • गेलने बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये तब्बल 114  मीटर लांब षटकार खेचला आहे. 

Web Title: chris gayle storm back before IPL, banana new record in T20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.