आॅस्ट्रेलिया संघ चेन्नईत दाखल, आज होणार टीम इंडियाची निवड

बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेला 17 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. 17 सप्टेंबर  रोजी होणा-या ५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीसाठी कर्णधार स्टीव्ह स्मिथसह आॅस्ट्रेलिया संघातील खेळाडूंची

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 09:20 AM2017-09-10T09:20:59+5:302017-09-10T09:34:39+5:30

whatsapp join usJoin us
 Australian team to be inducted in Chennai | आॅस्ट्रेलिया संघ चेन्नईत दाखल, आज होणार टीम इंडियाची निवड

आॅस्ट्रेलिया संघ चेन्नईत दाखल, आज होणार टीम इंडियाची निवड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, दि. 10 -  बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेला 17 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. 17 सप्टेंबर  रोजी होणा-या ५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीसाठी कर्णधार स्टीव्ह स्मिथसह आॅस्ट्रेलिया संघातील खेळाडूंची दुसरी तुकडी दाखल झाली आहे. स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यासह संघातील पाच अन्य खेळाडू ढाका येथून मुंबईमार्गे चेन्नईला पोहोचले. खेळाडू विमानतळावरून संघाचे निवासस्थान असलेले पंचतारांकित हॉटेलकडे रवाना झाले. संघाचे मुख्य मार्गदर्शक डेरेन लेमन बांगलादेश मालिकेनंतर आॅस्ट्रेलियाला गेले. सहायक मार्गदर्शक डेव्हिड साकेर भारताविरुद्धच्या वन डे, टी-२० सामन्यांसाठी संघाची जबाबदारी सांभाळतील. या मालिकेसाठी टीम इंडियाची आज निवड होणार आहे.  

भारत-आॅस्ट्रेलिया मालिका जुन्याच नियमानुसार, नवे नियम न्यूझिलंडच्या भारत दौ-यापासून लागू होणार-

भारत- आॅस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबर या कालावधीत होणा-या क्रिकेट मालिकेत जुन्याच नियमांचा अवलंब होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे. नवे नियम न्यूझिलंडच्या भारत दौ-यापासून लागू होणार आहेत.
नव्या नियमांत आचारसंहिता, डीआरएसचा उपयोग आणि बॅटचा आकार आदींचा समावेश आहे. हे नियम १ आॅक्टोबरपासून लागू होणार होते पण दोन कसोटी सामने २८ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने हा निर्णय बदलण्यात आला. भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात पाच वन डे आणि तीन टी-२० सामने खेळविले जातील.
स्वत:चे नाव उघड न करण्याच्या अटीवर बीसीसीआयचा एक अधिकारी म्हणाला,‘नव्या नियमात पायचितच्या रेफ्रल पद्धतीत बदल करण्यात आला आहे. पंचासोबत गैरव्यवहार करणाºया खेळाडूला मैदानाबाहेर पाठविण्याचा अधिकार देखील आहे.

बॅटच्या अकाराचा नियम बदलण्यात आला असून फलंदाजाने क्रीज ओलांडल्यानंतर त्याची बॅट हवेत असेल तरी त्याला बाद दिले जाणार नाही. आधी अशा स्थितीत फलंदाज बाद ठरत होता.

 

Web Title:  Australian team to be inducted in Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.