Asia Cup 2018 updates : भारताचा बांगलादेशवर दिमाखदार विजय, रोहित शर्माच्या नाबाद 83 धावा

Asia Cup 2018 LIVE: बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 174 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी संयमी खेळी केली. त्यांनी दहा षटकांत बिनबाद 51 धावा केल्या. शकीब अल हसनने भारताला पहिला धक्का दिला. त्याने धवनला पायचीत केले. त्यानंतर रोहितने सामन्याची सुत्रे हाती घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 04:35 PM2018-09-21T16:35:42+5:302018-09-21T23:53:05+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2018 LIVE: India won the toss and bowled first bowling | Asia Cup 2018 updates : भारताचा बांगलादेशवर दिमाखदार विजय, रोहित शर्माच्या नाबाद 83 धावा

Asia Cup 2018 updates : भारताचा बांगलादेशवर दिमाखदार विजय, रोहित शर्माच्या नाबाद 83 धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताच्या 25 षटकांत 2 बाद 117 धावा झाल्या आहेत.



रोहित शर्माने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. मात्र अंबाती रायुडू 13 धावांवर बाद झाला.



 

बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 174 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी संयमी खेळी केली. त्यांनी दहा षटकांत बिनबाद 51 धावा केल्या. मात्र शिखर धवन 40 धावांवर माघारी गेला. त्यानंतर रोहितने सामन्याची सुत्रे हाती घेतली आणि संघाला 20 षटकांत 1 बाद 89 धावांचा पल्ला गाठून दिला. 





बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझ व मश्रफे मोर्ताझा यांनी आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर गटातील लढतीत भारताविरुद्ध विक्रमाची नोंद केली. दोघांनी आठव्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करून नवा विक्रम केला. त्यांच्या या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने 150 धावांचा पल्ला पार केला. आठव्या विकेटने भारताला चांगलेच झुंजवले. बांगलादेशने 50 षटकांत सर्वबाद 173 धावा केल्या.


बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझ व मश्रफे मोर्ताझा यांनी आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर गटातील लढतीत भारताविरुद्ध विक्रमाची नोंद केली. दोघांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून नवा विक्रम केला. त्यांच्या या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने 150 धावांचा पल्ला पार केला. 



 

बांगलादेशच्या 41 षटकांत 7 बाद 132 धावा



रवींद्र जडेजाने चार वर्षांतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना बांगलादेशला सातवा धक्का दिला. जडेजाने वैयक्तिक चौथी विकेट घेत बांगलादेशची अवस्था 7 बाद 101 अशी केली. 



रिव्हू नसल्याने महमदुल्लाहची विकेट भारताला भेट मिळाली. 



हार्दिक पंड्याच्या जागी संघात स्थान मिळवलेल्या रवींद्र जडेजाने बांगलादेशचे कंबरडे मोडले. त्याने तीन विकेट घेताना बांगलादेशचा निम्मा संघ 65 धावांवर माघारी पाठवला.  मात्र महमदु्ल्ला आणि मोसाडेक होसेन यांनी संयमी खेळ करताना संघाला शंभर धावांचा पल्ला गाठून दिला. 








 

पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर लिटन दासला ( 7) केदार जाधवकरवी झेलबाद केले, पुढील षटकात नझमुल होसेनही माघारी परतला. बांगलादेशचे दोन फलंदाज 16 धावांवर बाद झाले.


नाणेफेक जिंकून भारताचे प्रथम क्षेत्ररक्षण

- दुबई, आशिया चषक 2018 : साखळी गटात अपराजीत राहिलेला भारतीय संघ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर गटात बांगलादेशचा सामना करणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवल्यानंतर भारत अंतिम फेरीत आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी आज मैदानात उतरणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात एक बदल केलेला आहे. हार्दिक पंड्याच्या जागी रवींद्र जडेजाला संधी मिळाली आहे.



असा अाहे भारतीय संघ





 

Web Title: Asia Cup 2018 LIVE: India won the toss and bowled first bowling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.