विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात, हे आहे लॉजिक

कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात येणार असल्याचा अजब योगायोग आमच्या हाती आला आहे.

By Namdeo.kumbhar | Published: December 14, 2017 05:20 PM2017-12-14T17:20:44+5:302017-12-14T17:24:32+5:30

whatsapp join usJoin us
2019 World Cup in India due to Virus's wedding, this is Logic | विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात, हे आहे लॉजिक

विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात, हे आहे लॉजिक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे1983मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतानं वेस्ट इंडिजचा पराभव करत पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं होतं.2011मध्ये धोनीच्या नेत्वृताखाली भारतानं श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. 2019 च्या विश्वचषकापूर्वीच विराट कोहली विवाहबंधनात अडकला आहे.

नवी दिल्ली - कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात येणार असल्याचा अजब योगायोग आमच्या हाती आला आहे. 1983 आणि 2011 मध्ये भारतानं जिंकलेल्या विश्वचषकावेळी जो योगायोग जुळून आला होता. तोच योगायाग विराट कोहलीच्या लग्नामुळे आला आहे.

1983मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतानं वेस्ट इंडिजचा पराभव करत पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं होतं. त्यांनतर 2011मध्ये धोनीच्या नेत्वृताखाली भारतानं श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. विश्वचषक खेळण्यापूर्वी दोन वर्ष कपिल आणि धोनीनं लग्न केलं होतं. हाच योगायोग विराट कोहलीच्या बाबतीत घडू शकतो.  

1980 मध्ये कपिल देव रोमी भाटिया बरोबर लग्नबंधनात अडकला होता. लग्नानंतरचा पहिला वर्ल्डकप कपिल 1983 मध्ये खेळला. यावेळी कपिलदेवच्या कर्णधारपदाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं वेस्ट इंडिजचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं. 2010मध्ये धोनीनं साक्षीसोबत लग्न केलं. 2011 च्या विश्वचषाकत भारतानं श्रीलंकेचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं. विरुष्काचे लग्न भारतीय संघासाठी लकी होतय का?  1987 मध्ये इंग्लंडचा पराभव करत ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार कपिलच होता. 1992मध्ये पाकिस्ताननं इंग्लंडचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं. 1992 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व मोहम्मद अजहरुद्दीन होतं. अजहरुद्दीनचे लग्न 1987मध्ये नौरीनसोबत झालं होतं. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार कपिलदेव होता. त्यामुळे अजहरुद्दीनसोबत हा फॉर्मुला लागू झाला नाही. त्यानंतर 1996 आणि 1999मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व अजहरुद्दीनकडेच होते. 2003 मद्ये भारतीय संघ सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळत होता. यावेळी भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली. पण विश्वचषक जिंकण्यात अपयश आलं होतं. सौरव गांगुलीनं 1997मध्ये डोना गांगीलीशी लग्न केलं होतं. त्यावेळी तो अजहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळत असल्यामुळे त्याच्यावर हा फॉर्मुला लागू झाला नाही. 2007मध्ये भारतीय संघ राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळत होता. राहुलचे लग्न 2003 मध्ये झालं होतं. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार गांगुली होता. त्यामुळे त्याच्यावरही हा फॉर्मुला लागू झाला नाही. त्यानंतर 2011 चा विश्वचषक भारत धोनीच्या कर्णधारपदाखी खेळत होता. भारतानं ह्या विश्वचषकावर नाव कोरलं. धोनीनं 2010 मध्ये साक्षीसोबत लग्न केलं होतं. 2015 मध्ये भारत धोनीच्याच नेतृत्वाखाली खेळला. त्यावेळी भारत फारशी कमाल दाखवू शकला नाही. उपांत्यपूर्व फेरीत आपला गाशा गुंडाळला होता. आता तुम्ही म्हाणाल,  धोनी आणि कपिलला दुसऱ्यांदा यश का आलं नाही. हा फॉर्मुला फक्त लग्नानंतर पहिल्या वर्ल्डकपला लागू झाला आहे. 

2019 च्या विश्वचषकापूर्वीच विराट कोहली विवाहबंधनात अडकला आहे. जर पुन्हा हाच योगायोग जुळून आला तर भारत तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकणार हे नक्की. ज्याप्रमाणे 183 धावांचा योगायोग आहे तसाच हा ही एक योगायोगच म्हणावे लागेल. भारतीय खेळाडूनं 183 धावा केल्या तो कर्णधार झाला आहेच. धोनी, गांगुली, कपिल आणि विराट यांचा वन-डेती सर्वोत्कृष्ट स्कोर 183 आहे. 2019 चा विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे. भारतीय संघानं त्यादृष्टीनं तयारीही सुरु केली आहे. आपल्या कच्च्या दुव्यावर विराटसेनंच काम सुरु आहे. विराटसेनेची मेहनत आणि योगायोग यांचे जर योग्य ते मिश्रण झालं तर 2019 चा विश्वचषक भारतात येणार ये नक्की. विराटसेनेनं जर 2019 च्या विश्वचषकावर नाव कोरलं तर त्याचे  थोडेफार श्रेय अनुष्काला द्याला हरकत नाही.......
 

 

Web Title: 2019 World Cup in India due to Virus's wedding, this is Logic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.