‘गोपाल’काच्या रिसोर्टवर शिजली ‘वंचितांची’ खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 11:45 PM2019-04-06T23:45:14+5:302019-04-06T23:45:44+5:30

युद्ध आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते

On the resort of 'Gopal', 'Shukali' | ‘गोपाल’काच्या रिसोर्टवर शिजली ‘वंचितांची’ खिचडी

‘गोपाल’काच्या रिसोर्टवर शिजली ‘वंचितांची’ खिचडी

googlenewsNext
ठळक मुद्देमैदानात सध्या तरी ३० उमेदवार आहेत.निवडणुकीत मदत करण्यासाठी झाली बैठक

औरंगाबाद : युद्ध आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते, असे बोलले जाते, ते उगाच नाही. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातदेखील याप्रमाणेच राजकीय घडामोडी होऊ लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सध्या तरी ३० उमेदवार आहेत. यातील काही उमेदवार ८ एप्रिलपर्यंत माघार घेण्याची राजकीय चर्चा आहे.

प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होण्याची चिन्हे असली तरी एका उमेदवाराने लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावे. यासाठी पेशाने वकील असलेल्या ‘गोपाल’काच्या शहरालगतच्या रिसॉर्टवर ‘व्होट बँंक’ तोडाफोडीच्या उद्देशाने धर्तीवर एका उमेदवाराला मदत करण्यासाठी बैठक झाल्याची चर्चा आहे.

विधानसभा सदस्य तथा लोकप्रतिनिधी असलेल्या उमेदवाराचा ‘गोपाल’क खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे ‘गोपाल’काने मध्यस्थी करून सगळी भट्टी जमविली. मागील महिन्यात तो लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे त्याने जाहीरपणे माध्यमांना सांगितले होते; परंतु ‘गोपाल’काने मध्यस्थी करून वारंवार बैठक घेऊन युतीसाठी आपल्या मित्राला लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची विनंती केली. अर्थात, हे सगळे काही फुकट ठरले नसेल.

२० वर्षांपासून सत्तेत असणाऱ्याच्या गोटातदेखील सदरील उमेदवार आपणच उभा केलेला आहे, अशी चर्चा आहे. या मोबदल्यात ‘गोपाल’काच्या नजीकच्या एका जणाला जिल्हा उपाध्यक्षपदाची बक्षिसी मिळाली आहे. मुळात ज्याला बक्षिसी मिळाली आहे, त्या व्यक्तीने बेगमपुऱ्यातील मनपा पोटनिवडणुकीत पक्षविरोधी काम केले होते, अशी तक्रार त्या पक्षाच्या नेत्यांकडे एका बैठकीत करण्यात आली होती. मात्र, त्या नेत्यालादेखील या प्रकरणात कुणीही विचारात घेतले नाही. सगळ्या विरोधाला बाजूला ठेवण्यात आले.

हा सगळा खटाटोप कशासाठी
लोकसभा मतदारसंघातील एका विशिष्ट समाजाच्या मतांचे विभाजन करण्यासाठी या ‘गोपाल’क वकिलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून राजकीय खिचडी शिजविली. त्यामध्ये त्याला यश आले. एका आघाडीच्या नावाने सदरील उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. शहरातील सामाजिक वातावरणाचा लाभ २० वर्षांपासून ज्यांना मिळतो आहे, त्यांनाच यावेळी तसाच लाभ मिळावा, यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आल्याचे दिसते आहे. ज्या पक्षाची मदार धर्मनिरपेक्ष मतांवर आहे, तीच मते जर मॅनेज उमेदवाराने खाल्ली, तर इच्छित उमेदवाराचा स्वार्थ पूर्ण होईल, त्या अर्थाने त्या ‘गोपाल’काने मध्यस्थी केल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची एक आॅडिओ क्लिपदेखील काही कार्यकर्त्यांकडे असल्याची चर्चा आहे.

Web Title: On the resort of 'Gopal', 'Shukali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.