OMG ! सलमान खान आणि आमिर खानच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार सुशांत सिंग राजपूत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 10:30 AM2018-07-05T10:30:18+5:302018-07-05T10:35:05+5:30

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चढ-उतार आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सुशांत लवकरच अमिताभ बच्चन यांच्या 'आँखे 2' या प्रोजेक्टचा भाग बनू शकतो.

Will Sushant Singh Rajput appear in the remake of Salman Khan and Aamir Khan's film? | OMG ! सलमान खान आणि आमिर खानच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार सुशांत सिंग राजपूत ?

OMG ! सलमान खान आणि आमिर खानच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार सुशांत सिंग राजपूत ?

googlenewsNext
ठळक मुद्दे सुशांत  'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' सिनेमाच्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंगने चंद्रावर जमीन खरेदी केली आहे

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चढ-उतार आले आहेत. एक बाजूला त्याच्या हाती मोठ-मोठे प्रोजेक्ट लागतायेत तर दुसऱ्या बाजूला त्याचे अनेक प्रोजेक्ट काही कारणांमुळे बंद पडतायेत. सूत्रांच्या माहितीनुसार सुशांत लवकरच अमिताभ बच्चन यांच्या 'आँखे 2' या प्रोजेक्टचा भाग बनू शकतो. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुशांत सिंग राजपूतशी यासंदर्भात चर्चा केली आहे आणि लवकरच याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.  


डीएनएच्या रिपोर्टनुसार सुशांत सिंग राजपूत सलमान खान आणि आमिर खानचा ब्लॉकबस्टर कॉमेडी चित्रपट 'अंदाज अपना अपना'च्या रिमेकमध्ये काम करणार आहे. अजून या चित्रपटासंदर्भात फायनल निर्णय होणे बाकी आहे. तसेच अजून हेही स्पष्ट होणे बाकी आहे की सुशांत या चित्रपटात आमिर खानची भूमिका साकारणार की सलमान खानची.  


सुशांत लवकरच त्याचा मित्र आणि कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडासोबत 'द फॉल्ट इन ऑर स्टार्स'चा हिंदी रिमेकवर काम सुरु करणार आहे. याचसोबत तो नितेश तिवारीच्या आगामी चित्रपटातसुद्धा दिसणार आहे. ऐवढेच नाही तर सुशांत  'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' सिनेमाच्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. या सिनेमात धोनीचा कर्णधार होण्यापासूनचा तर टी-20 मधून सन्यास हा प्रवास दाखवला जाणार असल्याची माहिती मिळते. त्यासोबतच वर्ल्ड कपमध्ये मिळवलेला विजयही यात दाखवण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2019 मध्ये  'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाच्या सीक्वलचं काम सुरु होईल. 


काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंगने चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. चंद्रावर Mare Muscoviense वा Sea of Muscovy  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात मी जमिनीचा तुकडा खरेदी केला असल्याचे खुद्द सुशांतनेच या मुलाखतीत सांगितले.

Web Title: Will Sushant Singh Rajput appear in the remake of Salman Khan and Aamir Khan's film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.