कोण ठेवणार शाहिद कपूर व मीरा राजपूतच्या दुस-या बाळाचे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 20:44 IST2018-08-17T20:41:26+5:302018-08-17T20:44:41+5:30

 तूर्तास तरी शाहिद रिल लाईफमुळे नाही तर रिअल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, शाहिद दुस-यांदा बाप बनणार आहे. 

 Who will name Shahid Kapoor and Mira Rajput's second child? | कोण ठेवणार शाहिद कपूर व मीरा राजपूतच्या दुस-या बाळाचे नाव?

कोण ठेवणार शाहिद कपूर व मीरा राजपूतच्या दुस-या बाळाचे नाव?

शाहिद कपूर सध्या ‘बत्ती गुल, मीटर चालू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झालाय. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तूर्तास तरी शाहिद रिल लाईफमुळे नाही तर रिअल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, शाहिद दुस-यांदा बाप बनणार आहे. शाहिदची पत्नी मीरा राजपूत लवकरच दुस-या बाळाला जन्म देणार आहे. या दुस-या बाळाचे नाव काय ठेवणार, असा प्रश्न अलीकडे मीराला केला गेला. या प्रश्नावर मीराने एक मजेशीर खुलासा केला. मीराने सांगितले की, मीशाचे नाव शाहिदने ठेवले होते. तिचे नाव माझ्या आणि शाहिदच्या नावाचे कॉम्बिनेशन होते. पण दुस-या  बाळाचे नाव, मग तो मुलगा होवो की मुलगी मी ठेवणार आहे. अर्थात अद्याप मी तरी कुठलेही नाव ठरवलेले नाही, असेही ती म्हणाली. २०१६ मध्ये शाहिद व मीराची पहिली मुलगी मीशा हिचा जन्म झाला होता.
नुकताच मीराने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला. एका अ‍ॅण्टीएजिंग क्रिमची जाहिरात करताना ती दिसली. तिची ही जाहिरात बघून, तिच्या अ‍ॅक्टिंग टॅलेंटचे कौतुक केले तर काहींनी टीकाही केली. मात्र मला टीकेने काहीही फरक पडत नाही, असे मीराने स्पष्ट केले.

 

Web Title:  Who will name Shahid Kapoor and Mira Rajput's second child?