कोण आहे मिथुन चक्रवर्तीची होणारी सून मदालसा शर्मा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 12:29 PM2018-06-07T12:29:50+5:302018-06-07T17:59:50+5:30

मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह चक्रवर्ती लवकरच बोहल्यावर चढतोय. त्याच्या होणा-या वधूबद्दल सध्या त्यामुळे जोरदार चर्चा आहे. याचे एक कारण ...

Who is Mithun Chakraborty Sued Madalasa Sharma? | कोण आहे मिथुन चक्रवर्तीची होणारी सून मदालसा शर्मा?

कोण आहे मिथुन चक्रवर्तीची होणारी सून मदालसा शर्मा?

googlenewsNext
थुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह चक्रवर्ती लवकरच बोहल्यावर चढतोय. त्याच्या होणा-या वधूबद्दल सध्या त्यामुळे जोरदार चर्चा आहे. याचे एक कारण म्हणजे, मिमोहची होणारी ‘दुल्हनियां’ कमालीची सुंदर आहे. शिवाय मिथुन चक्रवर्तीच्या घरची सून होणार असल्यानेही ती चर्चेत आहे.


मिमोहच्या होणा-या पत्नीचे नाव आहे, मदालसा शर्मा. मिमोह व मदालसाचा अलीकडेच साखरपुडा झाला. येत्या जुलैमध्ये हे कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.  आता ही मदालसा शर्मा कोण हे आपण जाणून घेऊ यात.



मिमोहच्या होणा-या पत्नीचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही, असा दावा केला जात होता. पण तसे नाहीये. मदालसा एक अभिनेत्री आहे. हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ, जर्मन, पंजाबी अशा अनेक भाषिक चित्रपटांत तिने काम केले आहे. मदालसा लहानपणापासूनच अभिनेत्री बनू इच्छित होती. याला कारणही होते. कारण मदालसाचे आई-वडील हे बॉलिवूड इंडस्ट्रीशी जुळलेले होते. मदालसाच्या पित्याचे नाव सुभाष शर्मा आहे.



सुभाष शर्मा एक नामवंत दिग्दर्शक आहेत. मदालसाची आई शीला शर्मा सुद्धा अभिनेत्री आहे . ‘नदिया के पार’, ‘यस बॉस’, ‘घातक’, ‘हम साथ साथ है’ यासारख्या हिट चित्रपटात शीला शर्मा यांनी काम केले आहे. १९९८ मध्ये आलेल्या बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेत शीला देवकीच्या भूमिकेत दिसल्या होत्या.



मदालसाचे शिक्षण मुंबईच्या मिठीबाई कॉलेजात झाले. यानंतर तिने किशोर नामित कपूर यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले. शिवाय गणेश आचार्य आणि श्यामक डावर यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले. ‘फिटींग मास्टर’ या तेलगू चित्रपटातून तिने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला. यानंतर मदालसा कन्नड चित्रपटांकडे वळली. यानंतर ‘एंजेल’ या हिंदी चित्रपटात ती दिसली. हा चित्रपट कोरिओग्राफर गणेश आचार्य याने प्रोड्यूस केला होता. याशिवाय ‘अ गर्ल विद द इंडियन एमेरोल्ड’ या जर्मन चित्रपटातही ती झळकली. यानंतर ‘पटियाला ड्रिम्स’ या पंजाबी चित्रपटात तिची वर्णी लागली. इमामी नवरत्न पावडरच्या जाहिरातीत जो चेहरा आहे, तो मदालसाचा आहे. संगीतात तिला विशेष रूची आहे. गिटारवादक अशीही तिची एक ओळख आहे.

ALSO READ : मिथुन चक्रवर्तीच्या मुलीने लावले सगळ्यांना वेड! सारा अली खान, जान्हवी कपूरला देतेय मात!!

Web Title: Who is Mithun Chakraborty Sued Madalasa Sharma?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.