घटस्फोटानंतर आता पूजा बत्रा पडली टायगर जिंदा है मधील या अभिनेत्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 01:13 PM2019-06-19T13:13:06+5:302019-06-19T13:13:53+5:30

प्रेक्षकांची लाडकी पूजा आता एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे.

Virasat Actress Pooja Batra Finds Her Soulmate in Tiger Zinda Hai Actor Nawab Shah, See Pics | घटस्फोटानंतर आता पूजा बत्रा पडली टायगर जिंदा है मधील या अभिनेत्याच्या प्रेमात

घटस्फोटानंतर आता पूजा बत्रा पडली टायगर जिंदा है मधील या अभिनेत्याच्या प्रेमात

googlenewsNext
ठळक मुद्देनवाबने ईदच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला होता. त्यात नवाबने पूजाचा हात पकडला असून त्याने या फोटोसोबत लिहिले आहे की, या गोष्टीसाठी तयार व्हायला मला ४६ वर्षं लागली. आता ती माझ्या आयुष्यात आली.

पूजा बत्राने मिस इंडिया हा किताब मिळवल्यानंतर ती बॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळली. पूजा बत्राने नायक, हसीना मान जायेंगी, जोडी नं १, कही प्यार ना हो जाएँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पूजा खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकली असली तरी विरासत या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हीच प्रेक्षकांची लाडकी पूजा आता एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे.

टायगर जिंदा है या चित्रपटात नवाब शाह एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. पूजा आणि नवाब यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नसली तरी नवाबने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या अनेक फोटोंमुळे त्यांच्यात मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक असल्याची चर्चा रंगली आहे. नवाबने ईदच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला होता. त्यात नवाबने पूजाचा हात पकडला असून त्याने या फोटोसोबत लिहिले आहे की, या गोष्टीसाठी तयार व्हायला मला ४६ वर्षं लागली. आता ती माझ्या आयुष्यात आली. माझ्या या जोडीदाराला ईद मुबारक.... माझ्याकडून सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा...

पुन्हा याच पोझमधील एक फोटो नवाबने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याने हॅपिनेस असे त्यासोबत लिहिले आहे. तसेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात पूजा खिडकीचे पडदे उघडताना दिसत असून त्यासोबत त्याने सन्डे सनशाईन असे लिहिले आहे. 

नवाबच्या इन्स्टाग्रामवर पूजासोबतचे अनेक फोटो, व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. एका फोटोत तो आणि पूजा बाईकवर बसलेले असून हा फोटो रोहतागमध्ये काढलेला आहे. तसेच त्यांचा गोव्याच्या बीचवरचा देखील एक सेल्फी आपल्याला त्याच्या अकाऊंटवर दिसून येत आहे. 

पूजाने एनआरआय डॉक्टरसोबत लग्न केल्यामुळे इंडस्ट्री सोडली होती. पण लग्नाच्या नऊ वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने अभिनयक्षेत्रात कमबॅक केला होता. पण तिला तितकेसे यश मिळाले नाही. तिचे अभिनेता अक्षय कुमारसोबतचे अफेअर देखील चांगलेच गाजले होते. पूजाच्या मॉडलिंगच्या दिवसांपासून ती अक्षयला ओळखत होती. आजही पूजा आणि अक्षय यांच्यातील मैत्री कायम आहे. पूजाच्या २०१७ ला प्रदर्शित झालेल्या मिरर गेम या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अक्षयने आवर्जून उपस्थिती लावली होती. 


 

Web Title: Virasat Actress Pooja Batra Finds Her Soulmate in Tiger Zinda Hai Actor Nawab Shah, See Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.