रिटा भादुरी होत्या अविवाहित, बहिणीच्या मुलीने केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 03:01 PM2018-07-17T15:01:46+5:302018-07-17T15:02:58+5:30

रिटा भादुरी या अविवाहित असल्याने त्यांच्यावर त्यांच्या बहिणाच्या मुलीने अंत्यसंस्कार केले. त्यांचे लग्न झाले नसल्याने त्या बहिणीच्या कुटुंबियांसोबतच राहात होत्या.

Veteran Actress Rita Bhaduri last rites | रिटा भादुरी होत्या अविवाहित, बहिणीच्या मुलीने केले अंत्यसंस्कार

रिटा भादुरी होत्या अविवाहित, बहिणीच्या मुलीने केले अंत्यसंस्कार

googlenewsNext

ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले. रिटा भादुरी या अविवाहित असल्याने त्यांच्यावर त्यांच्या बहिणाच्या मुलीने अंत्यसंस्कार केले. त्यांचे लग्न झाले नसल्याने त्या बहिणीच्या कुटुंबियांसोबतच राहात होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंधेरी चकाला येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
रिटा यांनी टीव्ही मालिकांव्यतिरिक्त बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे. रिटा यांच्या दिल व्हिल प्यार व्यार, क्या कहना, होते होते प्यार हो गया, हिरो नं , बेटा यांसारख्या चित्रपटातील तर हद्द कर दी, अमानत, कुमकुम यांसारख्या मालिकेतील भूमिका गाजल्या होत्या. रिटा या गेल्या कित्येक वर्षांपासून चित्रपट, मालिकांमध्ये काम करत आहेत. त्यांनी छोट्या पडद्यावर तर आपली एक जागा निर्माण केली आहे. पण सतीश शाह, जया भट्टाचार्य, टिकू तलसानिया, शिशीर शर्मा, परितोष साध हे सेलिब्रेटी वगळता इंडस्ट्रीतील कोणीही रिटा भादुरी यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली नाही. 
सध्या 'निमकी मुखिया'मध्ये रिटा भादुरी आजीची भूमिका साकारत होत्या. ‘निमकी मुखिया’ या मालिकेत त्यांनी साकारलेली इमरती देवीची भूमिका विशेष गाजली. रिटा या किडनीच्या विकाराने त्रस्त होत्या. त्यांना प्रत्येक दिवशी डायलिलिस करावे लागत होते. मात्र कौतुकास्पद बाब म्हणजे या कठीण दिवसांतही त्यांनी आपल्या मालिकेच्या शूटिंगमध्ये खंड पडू दिला नाही. सेटवर मिळालेल्या रिकाम्या वेळेत त्या आराम करायच्या. 'निमकी मुखिया'मधील स्टारकास्टही त्यांची सर्वतोपरी काळजी घेत होते. त्यांच्या उपचारांच्या वेळानुसार अन्य कलाकार आपल्या कामाचे वेळापत्रक सांभाळून घ्यायचे.
'वृद्धापकाळात होणाऱ्या आजारांना घाबरुन काम करणं का सोडावं, काम करणे आणि त्यात व्यस्त राहणे मला आवडते. आजाराविषयी सतत विचार करत बसणं मला पसंत नाही. यासाठी मी स्वत:ला कामात व्यस्त ठेवते,' असे काही दिवसांपूर्वी रिटा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 

Web Title: Veteran Actress Rita Bhaduri last rites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.