'उरी'चा बॉक्स ऑफिस धमाका, लवकरच तोडणार का बाहुबलीचा रेकॉर्ड?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 07:27 PM2019-02-11T19:27:12+5:302019-02-11T19:39:08+5:30

विकी कौशलच्या 'उरी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रिलीजनंतर पाचव्या आठवड्यातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करण्यात यशस्वी झाला आहे.

Uri box office collection are almost as much as bahubali | 'उरी'चा बॉक्स ऑफिस धमाका, लवकरच तोडणार का बाहुबलीचा रेकॉर्ड?

'उरी'चा बॉक्स ऑफिस धमाका, लवकरच तोडणार का बाहुबलीचा रेकॉर्ड?

googlenewsNext
ठळक मुद्देरिपोर्टनुसार पाचव्या आठवड्यात उरीने 12 कोटींची कमाई केली आहेउरी सिनेमाची घौडदौड अजून ही कायम आहे

विकी कौशलच्या 'उरी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रिलीजनंतर पाचव्या आठवड्यातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करण्यात यशस्वी झाला आहे. 'उरी'ने पाच आठवड्यापर्यंत 200 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. रिपोर्टनुसार पाचव्या आठवड्यात 'उरी'ने 12 कोटींची कमाई केली आहे. बाहुबलीने देखील पाचव्या आठवड्यात जवळपास ऐवढाच गल्ला जमावला होता. पाचव्या आठवड्यानंतर 'उरी' सिनेमाची घौडदौड अजून ही कायम आहे.


‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा 2019 मधला ब्लॉकबस्टर सिनेमा आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये. या सिनेमाने विकी कौशला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. या सिनेमातील ‘हाऊ इज द जोश’ हा डायलॉग प्रचंड गाजला सोशल मीडियापासून गल्लीबोळापर्यंत पोहोचला. 


 जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’ येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 19 भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने सर्जिकल स्ट्राइकने या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा याच सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे. चित्रपटाची कथा विहान शेरगिल या भारतीय जवानाभोवती फिरते. ही भूमिका विकी कौशलने साकारली आहे. विकी कौशलचा हा पहिला सिनेमा आहे ज्यात तो अॅक्शन करताना दिसला. या सिनेमात विकी कौशलसोबत मोहित रैना, परेश रावल, यामी गौतम व किर्ती कुलहारी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: Uri box office collection are almost as much as bahubali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.