Total Dhamaal box office collection: Anil Kapoor-Madhuri Dixit starrer earns Rs 123.80 crore | टोटल धमाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत केली इतकी कमाई
टोटल धमाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत केली इतकी कमाई

ठळक मुद्दे टोटल धमाल या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात देखील चांगली कमाई केली आहे. सोमवारी सुट्टी असल्याने या चित्रपटाला अधिक फायदा झाला. आतापर्यंत या चित्रपटाने १२५ कोटीहून अधिक गल्ला जमवला असून आता या चित्रपटाने १५० करोडचा टप्पा पार करण्याची सगळे वाट पाहात आहेत.शुक्रवारी या चित्रपटाने ४.७५ करोड, शनिवारी ७.०२ करोड, रविवारी ११.४५ करोड आणि सोमवारी ६.०३ करोड इतकी कमाई बॉक्स ऑफिसवर केली. 

'धमाल' चित्रपटाचा तिसरा भाग 'टोटल धमाल' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचा आता दुसरा आठवडा सुरू असून या चित्रपटाने १२३.८० करोडहून अधिक गल्ला जमवला आहे. 

फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. सोमवारी महाशिवरात्रीमुळे सुट्टी असल्याने या चित्रपटाला सोमवारी देखील बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करता आले असे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्वीट करून या चित्रपटाच्या कलेक्शनविषयी सांगितले आहे. त्यांनी लिहिले आहे की, टोटल धमाल या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात देखील चांगली कमाई केली आहे. सोमवारी सुट्टी असल्याने या चित्रपटाला अधिक फायदा झाला. आतापर्यंत या चित्रपटाने १२५ कोटीहून अधिक गल्ला जमवला असून आता या चित्रपटाने १५० करोडचा टप्पा पार करण्याची सगळे वाट पाहात आहेत. शुक्रवारी या चित्रपटाने ४.७५ करोड, शनिवारी ७.०२ करोड, रविवारी ११.४५ करोड आणि सोमवारी ६.०३ करोड इतकी कमाई बॉक्स ऑफिसवर केली. 

टोटल धमाल या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून त्यांचे आजवरचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. इंद्र कुमार यांच्या टोटल धमाल या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १६.५० कोटीचा गल्ला जमवला. या चित्रपटाला समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या नसल्या तरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. 

विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १७ वर्षानंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकत्र रुपेरी पडद्यावर दिसले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच ५० कोटी रुपयांचे गुप्त धन आणि ते मिळविण्यासाठी संपूर्ण टीमने केलेले कारनामे पाहायला मिळाले होते. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. 

या चित्रपटातून हॉलिवूडची अॅनिमल सेलिब्रिटी क्रिस्टलने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. टोटल धमाल’ हा सिनेमा ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट असून या फ्रेंचाइजीचा दुसरा सिनेमा ‘डबल धमाल’ होता.


Web Title: Total Dhamaal box office collection: Anil Kapoor-Madhuri Dixit starrer earns Rs 123.80 crore
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.