एकता कपूर- इम्तियाज अली यांच्यात मतभेद! ‘लैला मजनू’चे प्रमोशन वांद्यात!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 07:11 PM2018-07-17T19:11:18+5:302018-07-17T19:12:46+5:30

एकता कपूर हिने गत व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर एक मोठी घोषणा केली होती. ही घोषणा कुठली तर लैला मजनूंची अमर प्रेमकथा पुन्हा एकदा मॉडर्न रूपात मोठ्या पडद्यावर आणण्याची.

Tension brewing between Ekta Kapoor and Imtiaz Ali over Laila Majnu | एकता कपूर- इम्तियाज अली यांच्यात मतभेद! ‘लैला मजनू’चे प्रमोशन वांद्यात!!

एकता कपूर- इम्तियाज अली यांच्यात मतभेद! ‘लैला मजनू’चे प्रमोशन वांद्यात!!

एकता कपूर हिने गत व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर एक मोठी घोषणा केली होती. ही घोषणा कुठली तर लैला मजनूंची अमर प्रेमकथा पुन्हा एकदा मॉडर्न रूपात मोठ्या पडद्यावर आणण्याची. होय, एकता कपूर आणि इम्तियाज अली या दोघांनी यासाठी हातमिळवणी केली होती. गेल्या कित्येक दिवसांपासून सिनेप्रेमी या चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत. येत्या २४ आॅगस्टला ‘लैला मजनू’ नामक हा चित्रपट रिलीज होतोय. पण त्यापूर्वी एकता कपूर आणि इम्तियाज अली यांच्या प्रमोशनल स्ट्रॅटेजीवरून बिनसल्याचे कानावर येतेय.
एकताला म्हणे, या चित्रपटाची आक्रमक प्रमोशन व्हावे, असे वाटतेय. याऊलट इम्तियाजचे मत वेगळे आहे. लैला- मजनू यांची प्रेमकहाणी नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न असल्याने त्याचं प्रमोशन मोठ्या प्रमाणावर नको. अतिप्रसिद्धी न करता हा चित्रपट थेट प्रेक्षकांपर्यंत जावा, असे इम्तियाजचे म्हणणे आहे. याच कारणावरून एकता व इम्तियाज यांच्यात तूर्तास रचनात्मक मतभेद निर्माण झाल्याचे कळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुद्यावर एकता व इम्तियाजमध्ये अनेक बैठका झाल्यात. पण त्यातून कुठलीही सहमती झाली नाही.
लैला मजनूची प्रेमकथा सर्वाधिक ऐतिहासिक प्रेमकथांपैकी एक आहे. याआधीही लैला मजनूच्या अमर प्रेमकथेवर बॉलिवूड चित्रपट बनला आहे. या चित्रपटात ऋषि कपूरने मजनूची भूमिका साकारली होती. आता हीच कथा एका मॉडर्न रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकता या चियत्रपटाची निर्माती आहे तर इम्तियाज अली याचा प्रेझेंटर. इम्तियाजचा भाऊ साजिद अली हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. एकता इम्तियाजवर नाराज असली तरी साजिद अलीच्या कामावर ती खूश आहे.
लैला मजनूची प्रेमकथा आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. लैला मजनू दोघेही पाकिस्तानात राहणारे होते. श्रीमंत घराण्यातील मजनूचा गरिब कुटुंबातील लैलावर जीव जडतो. लैलाच्या भावाला तिच्या या प्रेमाबद्दल करते आणि तो मजनूची हत्या करतो. लैलाला हे कळते तेव्हा ती मजनूच्या मृतदेहाजवळ जात तिथेच आत्महत्या करते. लैला मजनूबद्दल आणखीही एक कथा ऐकवली जाते. त्यानुसार, घरच्यांना आणि समाजाला त्यांचे प्रेम मान्य नसल्याने लैला मजनू घरातून पळून गेले आणि राजस्थानच्या एका वाळवंटात पोहोचले. येथे पाण्याने तडफडून दोघांचाही मृत्यू झाला.

Web Title: Tension brewing between Ekta Kapoor and Imtiaz Ali over Laila Majnu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.