Ekta Kapoor's announcement on the occasion of 'Valentine's Day'! Laila Majnu's immortal love story again! | ​‘व्हॅलेन्टाईन डे’च्या मुहूर्तावर एकता कपूरची मोठ्ठी घोषणा! पडद्यावर पुन्हा येणार लैला मजनूची अमर प्रेमकथा!!

बॉलिवूडची बडी निर्माती एकता कपूरने आजचा व्हॅलेन्टाईन डे आणखी खास बनवला. होय, व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर एकताने एक मोठी घोषणा केली. ही घोषणा कुठली तर लैला मजनूंची प्रेम कहाणी मोठ्या पडद्यावर आणण्याची. होय, इम्तियाज अलीसोबत लैला मजनू या प्रेमवेड्या युगुलांची कथा एकता मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहे. लैला मजनूची प्रेमकथा सर्वाधिक ऐतिहासिक प्रेमकथांपैकी एक आहे. याआधीही लैला मजनूच्या अमर प्रेमकथेवर बॉलिवूड चित्रपट बनला आहे. या चित्रपटात ऋषि कपूरने मजनूची भूमिका साकारली होती. आता हीच कथा एका मॉडर्न रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे.



या प्रोजेक्टसाठी एकताने इम्तियाज अलीसोबत हातमिळवणी केली आहे. एकता व इम्तियाज हे दोघेही दीर्घकाळापासून या प्रोजेक्टवर काम करत होते. अखेर आज व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी या चित्रपटाची घोषणा झाली. येत्या ४ मे रोजी ‘लैला मजनू’हा चित्रपट रिलीज होणार आहे. साजिद अली हा चित्रपट दिग्दर्शित करणार असून आज या चित्रपटाचे पहिले पोस्टरही लॉन्च करण्यात आले. या चित्रपटाबद्दल आणखी माहिती दिली गेलेली नाही. या चित्रपटात लैला व मजनूच्या लीड भूमिकेत कोण दिसणार, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. पण लवकरच या चित्रपटाचा टीजर रिलीज केला जाणार आहे.

ALSO READ : एकता कपूरने टेड टॉक्स इंडिया नई सोचमध्ये सांगितले तिच्या यशाचे रहस्य

लैला मजनूची प्रेमकथा आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. लैला मजनू दोघेही पाकिस्तानात राहणारे होते.  श्रीमंत घराण्यातील मजनूचा गरिब कुटुंबातील लैलावर जीव जडतो. लैलाच्या भावाला तिच्या या प्रेमाबद्दल करते आणि तो मजनूची हत्या करतो. लैलाला हे कळते तेव्हा ती मजनूच्या मृतदेहाजवळ जात तिथेच आत्महत्या करते. लैला मजनूबद्दल आणखीही एक कथा ऐकवली जाते. त्यानुसार, घरच्यांना आणि समाजाला त्यांचे प्रेम मान्य नसल्याने लैला मजनू घरातून पळून गेले आणि राजस्थानच्या एका वाळवंटात पोहोचले. येथे पाण्याने तडफडून दोघांचाही मृत्यू झाला.
Web Title: Ekta Kapoor's announcement on the occasion of 'Valentine's Day'! Laila Majnu's immortal love story again!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.