सोनाली बेंद्रेने शेअर केला मुलासोबतचा फोटो, पुन्हा लिहिली भावूक पोस्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 13:10 IST2018-07-19T13:09:46+5:302018-07-19T13:10:25+5:30

हाय ग्रेड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. सोनालीने स्वत: सोशल मीडियावर या आजाराची माहिती ...

 Sonali Bendre shared photo with son!! | सोनाली बेंद्रेने शेअर केला मुलासोबतचा फोटो, पुन्हा लिहिली भावूक पोस्ट!!

सोनाली बेंद्रेने शेअर केला मुलासोबतचा फोटो, पुन्हा लिहिली भावूक पोस्ट!!

हाय ग्रेड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. सोनालीने स्वत: सोशल मीडियावर या आजाराची माहिती दिली होती. पण ही बातमी स्वत:च्या १२ वर्षांच्या मुलाला सांगणे सोनाली आणि तिचा पती गोल्डी बेहल या दोघांसाठीही सर्वात कठीण काम होते. आईच्या आजाराची बातमी ऐकून तो कसा रिअ‍ॅक्ट होईल, ही भीती होती. पण सोनाली व गोल्डी दोघांनीही ही स्थिती धीराने आणि संयमाने हाताळली. खुद्द सोनालीने ट्विटरवर एक पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे.



 

माझा १२ वर्षे ११ महिने आणि ८ दिवसांच्या मुलाला माझ्या आजाराची बातमी कशी सांगावी, हा प्रश्न आम्हाला पडला होता. पण त्याला वास्तव सांगणेही गरजेचे होते. आजपर्यंत आम्ही त्याच्यापासून काहीच लपवले नव्हते. प्रत्येकवेळी आम्ही त्याच्याशी प्रामाणिक होतो. यावेळी आम्ही हाच निर्णय घेतला आणि सगळे वास्तव त्याच्यासमोर ठेवले. त्याने बातमी अतिशय संमजपणे घेतली. इतकेच नाही तर माझ्यासाठी ऊर्जा आणि सकारात्मकतेचा स्रोत बनला/ आता अनेकदा तो माझ्या पालकाच्या भूमिकेत असतो, असे सोनालीने लिहिले आहे. या पोस्टसोबत मुलासोबतचा फोटोही तिने शेअर केला आहे.
अलीकडे सोनालीने तिचे केस कापलेत. केस कापतांनाचा इमोशनल व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केला होता.

Web Title:  Sonali Bendre shared photo with son!!