चाहत्यांचे अतरंगी प्रश्न अन् शाहरूख खानची मजेशीर उत्तरं!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 09:41 IST2018-07-15T09:38:43+5:302018-07-15T09:41:46+5:30

  शाहरूख खानला कुणी प्रश्न विचारायची देर की, त्यावर त्याने दिलेल्या उत्तराची हेडलाईन झालीचं म्हणून समजा.

shahrukh khan fans ask shocking questions from actor during live chat | चाहत्यांचे अतरंगी प्रश्न अन् शाहरूख खानची मजेशीर उत्तरं!!

चाहत्यांचे अतरंगी प्रश्न अन् शाहरूख खानची मजेशीर उत्तरं!!

  शाहरूख खानला कुणी प्रश्न विचारायची देर की, त्यावर त्याने दिलेल्या उत्तराची हेडलाईन झालीचं म्हणून समजा. शाहरूख इंडस्ट्रीतला सर्वाधिक हजरजबाबी अभिनेता मानला जातो. अलीकडे चाहत्यांनाही शाहरूखच्या या स्वभावाचे दर्शन घडले. शूटींगसाठी घरून रवाना होत असताना या प्रवासात शाहरूखने इन्स्टावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. काही चाहत्यांनी शाहरूखला त्याच्या आवडी-निवडीबद्दल प्रश्न केलेत. काही चाहत्यांनी त्याला अनेक विनोदी प्रश्न विचारलेत. मग काय, या प्रश्नांवर शाहरूखनेही तितकीच मजेशीर उत्तरे दिलीत. मी तुझ्यासाठी जीव देऊ शकतो,असे एका चाहत्याने लिहिले. यावर शाहरूखने त्याची चांगलीच विकेट घेतली.

 ‘जीव देण्यापेक्षा तू माझ्यासाठी जिवंत राहणार का?,’ असे उत्तर त्याने दिलेत. तू इतका हॉट का, असा सवाल एका चाहतीने केले. यावर ‘रेड चिलीज’ (शाहरूखच्या फिल्म प्रॉडक्शनचे नाव) असे मजेशीर उत्तर शाहरूखने दिले.
असेच काही चाहत्यांचे मजेशीर प्रश्न आणि त्यावरचे शाहरूखची तितकीच मजेशीर उत्तरे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

फॅन - मी तुला एकदा भेटण्याची भीक मागतो.
शाहरूख- कुठे राहतोस, येऊन भेटतो.

फॅन - तू इतका हँडसम कसा
शाहरूख - काय करू, मी असाच जन्मलो

फॅन - तू लग्न इतक्या लवकर का केलेस
शाहरूख- भावा, लव्ह आणि लक कधीही चालून येते. दोन्हीही गौरीसोबत लवकरच चालून आले.

फॅन - तू कुठे आहेस
शाहरूख- मनात

सलमानचे एका शब्दात कसे वर्णन करशील?
शाहरूख - भाई

 

 

Web Title: shahrukh khan fans ask shocking questions from actor during live chat