शाहिद कपूर पुन्हा झाला बाबा, पत्नी मीरा राजपूतने दिला गोंडस मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 08:33 IST2018-09-06T08:31:20+5:302018-09-06T08:33:20+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पुन्हा बनला बाबा, पत्नी मीरा राजपूतने दिला गोंडस मुलाला जन्मशाहीद कपूर आणि मीरा राजपूत दुस-यांदा आई-बाबा झालेत.  शाहीदची पत्नी मीराने काल रात्री एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

shahid kapoor and mira rajput blessed with baby boy | शाहिद कपूर पुन्हा झाला बाबा, पत्नी मीरा राजपूतने दिला गोंडस मुलाला जन्म

शाहिद कपूर पुन्हा झाला बाबा, पत्नी मीरा राजपूतने दिला गोंडस मुलाला जन्म

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणिमीरा राजपूत दुस-यांदा आई-बाबा झालेत.  शाहिदची पत्नी मीराने काल रात्री एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. प्रसुती वेदना सुरू झाल्यामुळे मीराला काल सायंकाळी ४ वाजता हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 
शाहिद  आणि मीरा यांना याआधीच एक मीशा ही मुलगी आहे.७ जुलै २०१५ रोजी शाहिद व मीराचे लग्न झाले होते. एक वर्षानंतर २६ आॅगस्टला त्यांच्या घरी मीशाचा जन्म झाला . हे त्यांचे दुसरे अपत्य आहे.
मीराची आई बेला, शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर, भाऊ ईशान खट्टी यावेळी रूग्णालयात होते. शाहिद कपूर  सध्या पालकत्वाच्या सुट्टीवर असल्याचे कळतेय. या सुट्टीमुळेच शाहिद कपूरने त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले आहे.

शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती. म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती. यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. यानंतर मीराने मीशा नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर मीशा हेच मीराचे जग बनून जाईल, असे वाटले. पण मीरा आपली पर्सनल आणि सोशल लाईफ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करताना दिसतेय.  

Web Title: shahid kapoor and mira rajput blessed with baby boy