'सत्यमेव जयते' फेम आयशा शर्मा म्हणते कधीच करणार नाही 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 03:01 PM2018-07-17T15:01:47+5:302018-07-17T15:06:45+5:30

आयशा शर्मा 'सत्यमेव जयते' चित्रपटात जॉन अब्राहमसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

'Satyamev Jayate' Fame Ayesha Sharma will never do bold scene | 'सत्यमेव जयते' फेम आयशा शर्मा म्हणते कधीच करणार नाही 'हे' काम

'सत्यमेव जयते' फेम आयशा शर्मा म्हणते कधीच करणार नाही 'हे' काम

googlenewsNext
ठळक मुद्दे आयशा शर्मा करणार 'सत्यमेव जयते'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनेत्री आयशा शर्मा 'सत्यमेव जयते'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मिलाप मिलन जावेरी दिग्दर्शित या चित्रपटात अॅक्शन थ्रिलर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आयशा जॉन अब्राहमसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आयशाने चित्रपटात कधीच बोल्ड सीन करणार नसल्याचे सांगितले.

अभिनेत्री आयशा शर्मा जागरणच्या रिपोर्टनुसार कधीच बोल्ड सीन करणार नाही. ती म्हणाली की, 'बिकनी परिधान करेन. मात्र त्यापुढे मी काहीच करणार नाही आणि बोल्ड सीनदेखील कधीच करणार नाही.'
'सत्यमेव जयते'मध्ये आयशा शिखा नामक पशूवैद्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ती नेहमी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारी असून नेहमी सत्याची साथ देणारी असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या भूमिकेबाबत ती म्हणाली, 'शिखा ही वास्तविक भूमिका आहे. ती आजच्या काळातील मुलगी आहे. जेव्हा मी पटकथा वाचली आणि भूमिका समजून घेतली. तेव्हा तिच्या व माझ्या स्वभावात साम्य असल्याचे जाणवले. मला जे वाटते ते मी स्पष्टपणे बोलते.' आयशाने या चित्रपटातील भूमिकेसाठी शरिरयष्टी व आवाजावर खूप मेहनत घेतली आहे. 'सत्यमेव जयते' चित्रपटानंतर ती विपुल शाह यांच्या नमस्ते लंडनमध्ये अभिनेता अर्जुन कपूर व परिणीती चोप्रासोबत झळकणार आहे.
'यंगिस्तान', 'मुबारकां' आणि 'तुम बिन 2' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री नेहा शर्माची आयशा बहिण आहे. या दोघींचा जन्म बिहारमधील भागलपुर येथे झाला असून त्या दोघींचे शिक्षण दिल्लीत झाले आहे. आयशाने इंजिनिअरिंग केले आहे. त्या दोघींना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची मुभा आहे. मात्र त्याआधी शिक्षण पूर्ण केले पाहिजे अशी त्यांची अट होती. त्याप्रमाणे आयशाने तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नेहाच्या पावलांवर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये काम करण्यास तयार झाली आहे. आयशा कथ्थक नृत्यांगना आहे व तिला हिप हॉप, साल्सा व जॅझ हे डान्सदेखील येतात. इतकेच नाही तर 2016मध्ये ती 'किंगफिशर कॅलेंडर गर्ल' झाली होती. 

Web Title: 'Satyamev Jayate' Fame Ayesha Sharma will never do bold scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.