​‘केदारनाथ’ रखडल्याने सैरभैर झाली सारा अली खान! आता ‘सिम्बा’चा आधार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 15:14 IST2018-02-16T09:44:20+5:302018-02-16T15:14:20+5:30

सारा अली खानच्या वाट्याला सध्या जे येतेय, ते बॉलिवूडमध्ये नाव कमावू इच्छिणा-या कुणाच्याही वाट्याला येऊ नये. सारा बॉलिवूड डेब्यू ...

Sara Ali Khan was shocked by 'Kedarnath' Now the basis of 'Simba' !! | ​‘केदारनाथ’ रखडल्याने सैरभैर झाली सारा अली खान! आता ‘सिम्बा’चा आधार!!

​‘केदारनाथ’ रखडल्याने सैरभैर झाली सारा अली खान! आता ‘सिम्बा’चा आधार!!

रा अली खानच्या वाट्याला सध्या जे येतेय, ते बॉलिवूडमध्ये नाव कमावू इच्छिणा-या कुणाच्याही वाट्याला येऊ नये. सारा बॉलिवूड डेब्यू करणार, खरे तर या बातमीने अनेक बॉलिवूडप्रेमी सुखावले होते. खुद्द सारा अली खान, तिची आई अमृता सिंग आणि पापा सैफ अली खान सगळेच जाम आनंदात होते. साहजिकच, साराचा डेब्यू ग्रॅण्ड व्हावा, अशीच सा-यांची इच्छा होती. याच अपेक्षेने साराने ‘केदारनाथ’ साईन केला होता. पण दुर्दैवाने गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाबद्दल नाही त्या बातम्या कानावर येऊ लागल्या. आधी, खराब हवामानामुळे चित्रपट रखडला,मग यातील लीड हिरो सुशांत सिंग राजपूत याच्या नखºयांमुळे चित्रपट लांबल्याच्या बातम्या आल्या आणि अलीकडे  दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि निर्मात्यांमधील वादामुळे या चित्रपटाचे बारा वाजलेत. सध्या ‘केदारनाथ’चे शूटींग थांबवण्यात आल्याची खबर आहे. आता तर हा चित्रपट डबाबंद होणार, अशीही चर्चा आहे. या सगळ्या चर्चा निश्चितपणे साराच्या अपेक्षांवर पाणी फेरणाºया आहेत. पण कदाचित साराकडे प्लान- बी तयार आहे. होय,‘केदारनाथ’च्या नादात साराने अनेक बड्या चित्रपटांच्या आॅफर्स धुडकावून लावल्या होत्या. पण आता ‘केदारनाथ’चे भविष्य असे अधांतरी दिसत असल्याचे पाहून यापैकी  एका चित्रपटाची आॅफर सारा स्वीकारणार असल्याची खबर आहे. हा चित्रपट कुठला तर ‘सिम्बा’. होय, म्हणजेच   ‘केदारनाथ’ हातून गेलाच तर ‘सिम्बा’ हा साराचा डेब्यू सिनेमा असेल.

ALSO READ : ​ सारा अली खानच्या ‘डेब्यू’च्या मार्गात पुन्हा नवे विघ्न! थांबले ‘केदारनाथ’चे शूटींग!!

‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग लीड रोलमध्ये आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटासाठी अद्याप हिरोईन ठरलेली नाही. या चित्रपटासाठी मध्यंतरी जान्हवी कपूरचे नाव चर्चेत होते. पण आता जान्हवी नाही तर साराच्या नावाची चर्चा जोरात आहे. सगळे काही जुळून आले तर सारा या चित्रपटात लीड फिमेल रोलमध्ये दिसेल. अर्थात अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही.

Web Title: Sara Ali Khan was shocked by 'Kedarnath' Now the basis of 'Simba' !!