'गली गुलियां' चित्रपटातील बालकलाकार ओम सिंगचा खरा अनुभव रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 05:37 PM2018-08-30T17:37:13+5:302018-08-30T17:38:47+5:30

'गली गुलियां' या चित्रपटातील बालकलाकार ओम सिंगने इद्रिस नामक महत्त्वाची साकारली असून त्याच्या खऱ्या जीवनातील प्रसंग या सिनेमात दाखवले आहेत. 

The real experience of Om Singh Galli Guliyaan Movie | 'गली गुलियां' चित्रपटातील बालकलाकार ओम सिंगचा खरा अनुभव रुपेरी पडद्यावर

'गली गुलियां' चित्रपटातील बालकलाकार ओम सिंगचा खरा अनुभव रुपेरी पडद्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देओम सिंगने साकारली इद्रिसची भूमिका


आगामी सिनेमा 'गली गुलियां'मध्ये अभिनेता मनोज वाजपेयी, रणवीर शौरी व नीरज काबी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट सायकॉलॉजिकल ड्रामावर आधारीत असून परदेशात विविध चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला आहे आणि तिथे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाची कथा जुन्या दिल्लीच्या अासपासची दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील बालकलाकार ओम सिंग याने इद्रिस नामक महत्त्वाची साकारली असून त्याला त्याचे खरे आयुष्य या सिनेमातून दाखवले आहेत. 

'गली गुलियां' सिनेमाचे दिग्दर्शक दीपेश जैन यांनी ओम सिंगने साकारलेल्या भूमिकेसाठी अडीच हजार मुलांची ऑडिशन घेतले होते. अखेर या भूमिकेसाठी ओम सिंग त्यांना सलाम बाँम्बे सामाजिक संस्थेत सापडला. ही संस्था निराधार मुलांसाठी काम करते. बालशोषणातून ओम सिंगची मुक्तता या संस्थेने केली होती. जैन म्हणाले, 'जेव्हा मी ओमला भेटलो तेव्हा मला खूप धक्का बसला. कारण तो अत्याचाराला बळी पडला होता आणि बचावासाठी त्याने तिथून पळ काढला होता. त्याचा हा खूप भयानक अनुभव होता. मला या सिनेमातील इद्रिस मिळाला होता. मी त्याच्यासोबत काम करायला सुरूवात केली. त्याच्यासोबत खूप चर्चा केली आणि माझ्या स्क्रीप्टमधील घटनेवर तो कसा प्रतिक्रिया देतो आहे, हे पाहिले. त्याच्यासोबत संवाद साधल्यामुळे मला वास्तविकता या सिनेमात मांडता आली.'

ओम सिंगच्या जीवनातील काही अनुभव 'गली गुलियां' चित्रपटातील कथेत नमूद केले आहेत. त्यातील एक सीन म्हणजे 'गली गुलियां' सिनेमात घरातील अत्याचाराला कंटाळून पळून आलेला मुलगा कित्येक रात्र रेल्वेस्टेशनवरच काढतो. दीपेश जैन म्हणाले की, ओम दिल्लीला पळून आला आहे. तो तिथल्या प्लॅटफॉर्मवर थांबतो आणि लोक त्याला पाहून पुढे जातात. पण, त्याला तिथे कुणीही विचारत नाही. आम्ही त्याच प्लॅटफॉर्मवर व त्याच ठिकाणी चित्रीकरण केले. ओमने त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्रवास चित्रपटात साकारला आहे. 
'गली गुलियां' चित्रपट ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या सिनेमातील ओम सिंगचा खरा अनुभव रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Web Title: The real experience of Om Singh Galli Guliyaan Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.