रणवीर सिंगची बहीण दीपिका पादुकोण इतकीच आहे सुंदर, पाहा तिचे फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 06:00 AM2018-11-26T06:00:00+5:302018-11-26T06:00:06+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मेहेंदी सेरेमनीतील एक फोटो तर सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण या फोटोत दीपिकासोबत एक मुलगी दिसत असून ती खूपच सुंदर असल्याचे नेटकरींचे म्हणणे आहे. 

Ranveer singh Sister Ritika Bhavnani is as beautiful as deepika Padukone | रणवीर सिंगची बहीण दीपिका पादुकोण इतकीच आहे सुंदर, पाहा तिचे फोटो...

रणवीर सिंगची बहीण दीपिका पादुकोण इतकीच आहे सुंदर, पाहा तिचे फोटो...

googlenewsNext
ठळक मुद्देदीपिका पादुकोणसोबत या फोटोत दिसणारी मुलगी दुसरी कोणी नाही तर रणवीर सिंगची बहीण आहे. तिचे नाव रितिका भवनानी ती नेहमीच मीडियापासून दूर राहाणेच पसंत करते.रणवीर लग्नासाठी इटलीला रवाना झाला, त्यावेळी देखील रितिका त्याच्यासोबतच होती. रितिका ही रणवीरची मोठी बहीण असून एका आईप्रमाणेच ती त्याचा सांभाळ करते आणि त्यामुळे रणवीर तिला दीदी अशी हाक न मारता छोटी माँ हाक मारतो. रणवीर आणि त्याच्या बहिणीचे बॉण्डिंग खूपच छान आहे. तिला रणवीरसोबत अनेक ठिकाणी पाहाण्यात येते.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न नुकतेच इटलीत झाले. इटलीतील लेक कोमा या ठिकाणाची त्यांनी लग्न करण्यासाठी निवड केली होती. रणवीर आणि दीपिकाने केवळ त्यांच्या जवळच्या नातलगांच्या आणि मित्रमैत्रिणीच्या उपस्थितीत लग्न केलं. हे लग्न अतिशय थाटामाटात झाले. तसेच या लग्नाला प्रचंड सुरक्षा देखील ठेवण्यात आली होती. लग्नातील कोणत्याही पाहुण्याला लग्न विधी अथवा लग्न परिसरातील कोणताही फोटो अथवा व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती. कोंकणी आणि सिंधी अशा दोन पद्धतीने त्यांनी लग्न केले. सिंधी पद्धतीने लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी दीपिका आणि रणवीने त्यांच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडले. त्यांच्या मेहेंदी सेरेमनीतील एक फोटो तर सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण या फोटोत दीपिकासोबत एक मुलगी दिसत असून ती खूपच सुंदर असल्याचे नेटकरींचे म्हणणे आहे. 

दीपिका पादुकोणसोबत या फोटोत दिसणारी मुलगी दुसरी कोणी नाही तर रणवीर सिंगची बहीण आहे. तिचे नाव रितिका भवनानी ती नेहमीच मीडियापासून दूर राहाणेच पसंत करते. रणवीर लग्नासाठी इटलीला रवाना झाला, त्यावेळी देखील रितिका त्याच्यासोबतच होती. रितिका ही रणवीरची मोठी बहीण असून एका आईप्रमाणेच ती त्याचा सांभाळ करते आणि त्यामुळे रणवीर तिला दीदी अशी हाक न मारता छोटी माँ हाक मारतो. रणवीर आणि त्याच्या बहिणीचे बॉण्डिंग खूपच छान आहे. तिला रणवीरसोबत अनेक ठिकाणी पाहाण्यात येते.

रणवीर त्याच्या इन्स्टाग्रामला अनेकवेळा रितिका सोबत फोटो पोस्ट करत असतो. रितिकाला केवळ रणवीरसोबतच नव्हे तर दीपिकासोबत देखील पाहायला मिळते. नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात ती दीपिकाच्या बाजूला बसलेली दिसली होती. तिची दीपिकासोबत देखील चांगली मैत्री असून रणवीर आणि दीपिकाच्या लग्नानंतर तिने नुकतीच त्यांच्यासाठी एक पार्टी दिली होती. 

रितिकाची आवडती अभिनेत्री देखील दीपिकाच आहे. दीपिकाचे सगळेच चित्रपट तिला खूप आवडतात. 

Web Title: Ranveer singh Sister Ritika Bhavnani is as beautiful as deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.