तुम्ही रणवीर-आलियाच्या जोडीचे फॅन्स आहात तर ही बातमी वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 10:15 AM2019-04-08T10:15:27+5:302019-04-08T10:26:40+5:30

काही दिवसांपूर्वी 'तख्त'चा फिल्ममेकर करण जोहरने आपल्या सिनेमातील स्टार कास्टची घोषणा केली होती. या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भटच्या नावाची घोषणा होताच त्यांचे फॅन्स खुश झाले होते.

Ranveer singh and alia bhatt may be seen together in a new film | तुम्ही रणवीर-आलियाच्या जोडीचे फॅन्स आहात तर ही बातमी वाचाच

तुम्ही रणवीर-आलियाच्या जोडीचे फॅन्स आहात तर ही बातमी वाचाच

googlenewsNext
ठळक मुद्देहा सिनेमा एका मोठ्या बॅनरच्या अंतर्गत तयार होणार आहेरणवीर आणि आलियाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती

काही दिवसांपूर्वी 'तख्त'चा फिल्ममेकर करण जोहरने आपल्या सिनेमातील स्टार कास्टची घोषणा केली होती. या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भटच्या नावाची घोषणा होताच त्यांचे फॅन्स खुश झाले होते. मात्र तख्तमध्ये रणवीरच्या अपोझिट आलिया नाहीय तरिही आलिया- रणवीरच्या फॅन्सना निराश होण्याची गरज नाही. कारण एका नव्या प्रोजेक्टसाठी आलिया-रणवीरला मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे.  


सध्या या सिनेमाबाबत अजून काही जास्त माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही कलाकारांना यासिनेमासाठी लॉक करण्यात आले आहे. हा सिनेमा एका मोठ्या बॅनरच्या अंतर्गत तयार होणार आहे.

गली बॉयमध्ये रणवीर आणि आलियाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्यामुळे हा जोडीला पुन्हा एकदा बघायाला त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील. 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर आलियाचा 'कलंक' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर ती 'ब्रम्ह्यास्त्र'मध्ये रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तर रणवीर सिंग सध्या धर्मशाला इथं क्रिकेटचे धडे गिरवतोय. लवकरच तो कबीर खान दिग्दर्शित ८३ या सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

या सिनेमात १९८३ सालची भारतीय विश्वचषक विजयाची कथा रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे. १० एप्रिल, २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Ranveer singh and alia bhatt may be seen together in a new film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.