गत ९ वर्षांत इतका बदलला प्रियांका चोप्राचा ‘एक्स बॉयफ्रेन्ड’ हरमन बावेजा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 11:36 IST2017-06-13T06:06:15+5:302017-06-13T11:36:15+5:30
हरमन बावेजा आठवतो? होय, २००९ मध्ये आलेल्या ‘लव्ह स्टोरी२०५०’ या चित्रपटाचा हिरो. ‘लव्ह स्टोरी२०५०’मधून बॉलिवूड डेब्यू करणारा हरमन त्याच्या ...

गत ९ वर्षांत इतका बदलला प्रियांका चोप्राचा ‘एक्स बॉयफ्रेन्ड’ हरमन बावेजा!
ह मन बावेजा आठवतो? होय, २००९ मध्ये आलेल्या ‘लव्ह स्टोरी२०५०’ या चित्रपटाचा हिरो. ‘लव्ह स्टोरी२०५०’मधून बॉलिवूड डेब्यू करणारा हरमन त्याच्या अॅक्टिंगपेक्षा हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रीय झाला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण लुक्स आणि हॉट बॉडी यामुळे हरमनची त्यावेळी बरीच क्रेझ होती. अर्थात हळूहळू ही क्रेझ ओसरली आणि हरमन बॉलिवूडमधून बाहेर फेकल्या गेला. खूप वर्षांनंतर हरमनचे काही ताजे फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून प्रियांका चोप्रासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करणारा हाच तो हरमन, हे सांगूनही तुम्हाला पटणार नाही.
होय, एकेकाळी सिक्स पॅक अॅब्सचा बादशाह असलेला हरमन आज पुरता बदलला आहे. ना ते कसलेले शरीर, ना सिक्स अॅब्स. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही बातमीसोबत दिलेले हे फोटो पाहायलाच हवेत. पांढरे केस, वाढलेले वजन अशा रूपात हरमनला पाहणे तुमच्यासाठी आश्चर्याचा धक्का असेल. हरमन आता चित्रपट करत नाही. त्यामुळेच कदाचित शरिरावर मेहनत घेण्याचे कुठलेच औचित्य हरमनकडे उरलेले नसावे.
![]()
![]()
![]()
हरमन व प्रियांका चोप्रा यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या एकेकाळी प्रचंड गाजल्या होत्या. दोघेही पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. ‘लव्ह स्टोरी२०५०’च्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम फुलले होते. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले. यानंतर हरमन व बिपाशा यांच्या डेटींगच्या बातम्याही आल्यात.२०१४ मध्ये आपण बिपाशासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे हरमनने म्हटले होते. मात्र त्यावर्षी डिसेंबरमध्ये बिपाशाने हरमनसोबत ब्रेकअप झाल्याचे जाहिर केले. ‘विक्ट्री’,‘व्हाट्स योर राशी’,‘ढिश्कियाऊं’ असे चित्रपट हरमनच्या नावावर आहेत. पण हे सगळेच चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटलेत अन् हरमनच्या करिअरला उतरती कळा लागली.