सलमानची हिरोईन रंभाचे डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 21:10 IST2018-08-14T21:07:23+5:302018-08-14T21:10:16+5:30

सलमान खानची हिरोईन रंभा आठवतेय? होय, ‘बंधन’, ‘जुडवा’ या सिनेमात सलमान खानसोबत झळकलेली तीच ती रंभा. 

pregnant rambha sets the dance floor on fire at her baby shower | सलमानची हिरोईन रंभाचे डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?

सलमानची हिरोईन रंभाचे डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?

सलमान खानची हिरोईन रंभा आठवतेय? होय, ‘बंधन’, ‘जुडवा’ या सिनेमात सलमान खानसोबत झळकलेली तीच ती रंभा. रंभाने फार कमी चित्रपट केलेत. पण जे केलेत ते सगळे बड्या-बड्या स्टार्ससोबत केलेत. सलमानपासून, अनिल कपूर, अजय देवगण अशा अनेकांसोबत ती दिसली. लग्नानंतर रंभा संसारात अशी काही रमली की, तिने चित्रपटांना रामराम ठोकला. ही रंभा आठवायचे कारण म्हणजे, ती तिसऱ्यांदा आई होणार आहे, रंभाला दोन मुली आहेत. पहिली मुलगी लान्या ७ वर्षांची असून साशा ३ वर्षांची आहे. आता रंभा तिस-यांदा आई होणार आहे. नुकतेच तिचे डोहाळ जेवण थाटामाटात पार पडले.


यावेळी प्रसंगी रंभा अतिशय सुंदर दिसत होती. रंभाच्या चेह-यावरीचे तेज स्पष्टपणे दिसत होते. 

आपल्या डोहाळ जेवणाला रंभा नृत्य करतानाही दिसली.

चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर ८ एप्रिल २०१० रोजी रंभाने बिझनेसमॅन इंद्राण पद्मनाथनसोबत लग्न केले. रंभाला दोन मुली आहेत. लान्या आणि साशा.

२०११ मध्ये लान्याचा जन्म झाला तर २०१५ मध्ये साशा जन्मली. सोशल मीडियावर रंभा कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. फेसबुक व इन्स्टाग्रामवर ती आपले व कुटुंबाचे अनेक फोटो शेअर करत असते. रंभाचा पती मॅजिकवुड्स नामक कंपनीचा चेअरमन व सीईओ आहे. कॅनडास्थित ही कंपनी किचन कॅबिनेट आणि व्हॅनिटी व्हॅन बनवते.

Web Title: pregnant rambha sets the dance floor on fire at her baby shower