‘पीएम- नरेंद्र मोदी’चा ट्रेलर पाहून युजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 10:22 AM2019-03-22T10:22:02+5:302019-03-22T10:23:55+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम- नरेंद्र मोदी’ ह्या बायोपिकचा ट्रेलर काल गुरुवारी रिलीज झाला आणि हा ट्रेलर पाहिल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

pm modi trailer twitter reactions | ‘पीएम- नरेंद्र मोदी’चा ट्रेलर पाहून युजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया!!

‘पीएम- नरेंद्र मोदी’चा ट्रेलर पाहून युजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया!!

googlenewsNext
ठळक मुद्देयेत्या ५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात २०१४ मधील निवडणुका ते पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास दाखवला जाणार आहे. मेरी कोम आणि सरबजीत चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम- नरेंद्र मोदी’ ह्या बायोपिकचा ट्रेलर काल गुरुवारी रिलीज झाला आणि हा ट्रेलर पाहिल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना नेटकऱ्यांनी हा ट्रेलर पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
‘पीएम- नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. पण विवेकने मोदींच्या भूमिकेला जराही न्याय दिला नसल्याचे मत अनेक लोकांनी दिले आहे. ‘ पीएम मोदी विवेकपेक्षा चांगले अभिनेते आहेत,’ असे एका युजरने लिहिले आहे. अनेक लोकांनी हे बायोपिकमध्ये २०१९ चा बेस्ट कॉमेडी चित्रपट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.





या ट्रेलरच्या निमित्ताने काही युजर्सनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘चित्रपटाच्या नावावर काहीही. निवडणूक आयोगाला हे दिसत नाहीये का?’ असा सवाल एका युजरने केला आहे.








अर्थात अनेक युजर्सनी विवेकच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. आम्ही हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहोत, अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रियाही ट्विटरवर पाहायला मिळत आहेत.
येत्या ५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात २०१४ मधील निवडणुका ते पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास दाखवला जाणार आहे. मेरी कोम आणि सरबजीत चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात विविध दमदार राजकीय व्यक्तीरेखा पाहायला मिळणार आहेत. अभिनेता मनोज जोशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भूमिका साकारणार आहेत. हीराबेन म्हणजेच मोदींच्या आईची भूमिका अभिनेत्री जरीना वहाब साकारणार आहे. तर किशोरी शहाणे या इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री बरखा बिष्ट ही मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहे.

Web Title: pm modi trailer twitter reactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.