निक, ती तुझ्यावर वेड्यागत प्रेम करते ...! भावूक झाली परिणीती चोप्रा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 10:06 IST2018-08-19T10:05:07+5:302018-08-19T10:06:35+5:30

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचा ‘रोका’ झाला. लवकरचं दोघेही लग्नबंधनात अडकतील. प्रियांकाचे चाहते या बातमीने जाम खूश आहे. पण सर्वाधिक खूश कुणी असेल तर ती आहे, प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्रा. 

parineeti chopra expresses her feelings for priyanka chopra in an letter after roka ceremony with nick jonas | निक, ती तुझ्यावर वेड्यागत प्रेम करते ...! भावूक झाली परिणीती चोप्रा!!

निक, ती तुझ्यावर वेड्यागत प्रेम करते ...! भावूक झाली परिणीती चोप्रा!!

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचा ‘रोका’ झाला. लवकरचं दोघेही लग्नबंधनात अडकतील. प्रियांकाचे चाहते या बातमीने जाम खूश आहे. पण सर्वाधिक खूश कुणी असेल तर ती आहे, प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्रा. होय, प्रियांकाच्या साखरपुड्यानंतर परिणीती भावूक झालेली दिसली आणि तिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली.




‘आज मी एका जादुई परिकथेची साक्षीदार बनली. आम्ही लहान होतो तेव्हा, मीमी दीदी (प्रियांका) आणि मी ‘घर-घर’ खेळायचो. या खेळात आम्ही नवरी बनायचो, लाजून लाजून चूर व्हायचो. आम्हाला काल्पनिक मुलं व्हायची. आम्ही आमच्या नवऱ्याला चहा द्यायचो. थोड मजेशीर आहे. पण असे होते, कारण आम्हाला कायम प्रेमाच्या जादूवर विश्वास होता. एकदिवस आपल्यालाही मनासारखा राजकुमार मिळेल, अशी आशा आम्हाला होती. आज दीदीला तो परफेक्ट राजकुमार मिळाला. मी तिच्यासाठी निकपेक्षा अधिक परफेक्ट राजकुमाराची कल्पनाचं करू शकत नाही. कुठल्याही व्यक्तिला दोन प्रकारे ओळखता येते. एक तर त्याच्यासोबत प्रवास करून आणि दुसरे म्हणजे, त्याच्यासोबत जेवण करून. निक, मी तुझ्यासोबत या दोन्ही गोष्टी केल्या आहेत आणि म्हणूनचं तू तिच्यासाठी परफेक्ट आहेस, असे मी म्हणते. तिला असाच प्रेम कर कारण ती तुझ्यावर वेड्यागत प्रेम करते... तिची काळजी घे, कारण ती बाहेरून ती खूप स्ट्राँग दिसत असली तरी आतून मेणासारखी मऊ आहे. तुम्हाला रोका आणि भावी लग्नासाठी शुभेच्छा... ’, असे तिने लिहिले आहे़

Web Title: parineeti chopra expresses her feelings for priyanka chopra in an letter after roka ceremony with nick jonas