OMG! अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा रखडला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 10:03 AM2019-01-16T10:03:45+5:302019-01-16T10:04:23+5:30

अद्यापही चाहत्यांना अक्षयचा अ‍ॅक्शन अवतारचं अधिक भावतो. चाहते त्याला फुल ऑनअ‍ॅक्शन अवतारात बघू इच्छितात. पण तूर्तास तरी अशा चाहत्यांना निराश करणारी एक बातमी आहे.

OMG! farhad samji not directing akshay kumars veeram hindi remake | OMG! अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा रखडला!!

OMG! अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा रखडला!!

googlenewsNext
ठळक मुद्दे लवकरच अक्षय रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. रोहित व अक्षयची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने आपल्या करिअरची सुरूवात अ‍ॅक्शन चित्रपटांनी केली होती. अक्षयच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचे अपार प्रेम लाभले. काळानुसार, अक्कीने अ‍ॅक्शनसोबतच फॅमिली ड्रामा चित्रपटांची निवड केली. पण अद्यापही चाहत्यांना अक्षयचा अ‍ॅक्शन अवतारचं अधिक भावतो. चाहते त्याला फुल ऑन अ‍ॅक्शन अवतारात बघू इच्छितात. पण तूर्तास तरी अशा चाहत्यांना निराश करणारी एक बातमी आहे. होय, अक्षयने साऊथ सुपरस्टार अजीतच्या ‘वीरम’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचा निर्णय घेतला होता. ही बातमी ऐकून अक्षयच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण ताजी खबर मानाल तर ‘वीरम’च्या हिंदी रिमेकचे काम थंडबस्त्यात गेले आहे. 


२०१९ मध्ये अक्षयचे एका पाठोपाठ एक असे पाच सिनेमे रिलीज होणार आहेत. म्हणजे हे अख्खे वर्ष अक्षय जाम बिझी असणार आहे. अशात ‘वीरम’साठी वेळ काढणे त्याच्यासाठी जरा कठीण आहे. लेखक व दिग्दर्शक फरहाद सामजी हा चित्रपट दिग्दर्शित करणार, अशी खबर होती. पण आता सामजी यांनीही मी हा चित्रपट दिग्दर्शित करत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अक्षयचा हा चित्रपट पुन्हा सुरु होतो की नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.


काही दिवसांपूर्वी अक्षयचा असाच आणखी एक मोठा सिनेमा बंद झाल्याची खबर होती. होय, काही दिवसांपूर्वी अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर  ‘क्रॅक’ या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याने या चित्रपटाने पोस्टरही रिलीज केले होते. पण यानंतर नीरज पांडे दिग्दर्शित ‘क्रॅक’ रखडला. अद्यापही या चित्रपटावर काम सुरु झालेले नाही. अशात अक्षयने हा चित्रपट सोडल्याची खबर आहे.
 लवकरच अक्षय रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. रोहित व अक्षयची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. 

Web Title: OMG! farhad samji not directing akshay kumars veeram hindi remake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.