शाहरूख खान नाही ‘हा’ अभिनेता आहे करण जोहरचा ‘आॅल टाईम फेवरेट अ‍ॅक्टर’!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 05:22 PM2018-09-05T17:22:38+5:302018-09-05T17:23:11+5:30

शाहरूख खान आणि करण जोहर यांच्या मैत्रीचे दाखले दिले जातात. अनेक वर्षांनंतरही हे नाते आजही तसेच टवटवीत आहे. शाहरूख खान माझा मित्र नाही तर माझा भाऊ आहे, असे अनेकदा करण म्हणाला आहे. 

 not Shah Rukh Khan ranbir kapoor is karan johars all time favourite actor | शाहरूख खान नाही ‘हा’ अभिनेता आहे करण जोहरचा ‘आॅल टाईम फेवरेट अ‍ॅक्टर’!

शाहरूख खान नाही ‘हा’ अभिनेता आहे करण जोहरचा ‘आॅल टाईम फेवरेट अ‍ॅक्टर’!

googlenewsNext

शाहरूख खान आणि करण जोहर यांच्या मैत्रीचे दाखले दिले जातात. अनेक वर्षांनंतरही हे नाते आजही तसेच टवटवीत आहे. शाहरूख खान माझा मित्र नाही तर माझा भाऊ आहे, असे अनेकदा करण म्हणाला आहे. कदाचित म्हणूनच ‘कुछ कुछ होता है’पासून ‘माय नेम इज खान’पर्यंत करणच्या अनेक चित्रपटात शाहरूख दिसला. ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये करणने रणबीर कपूरला लीड रोलमध्ये घेतले खरे. पण तो शाहरूखला विसरला नाही. त्याच्या या चित्रपटात शाहरूख कॅमिओ रोलमध्ये दिसला. आता इतके प्रेम म्हटल्यावर करणचा सर्वाधिक आवडता अभिनेता कोण, असे कुणालाही विचारले तर समोरची व्यक्ती शाहरूख खान असेच नाव घेईल. पण असे नाहीयं. करण जोहरचा सर्वात आवडता अभिनेता शाहरूख नसून दुसराच कुणी आहे.


अलीकडे एका इव्हेंटमध्ये करणला हा प्रश्न विचारण्यात आला. यावर करण हमखास शाहरूखचेच नाव घेणार, असे सगळ्यांना वाटले. पण करणने शाहरूख नाही तर रणबीर कपूरचे नाव घेऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. माझा आॅल टाईम फेवरेट अ‍ॅक्टर रणबीर कपूर आहे. कारण तो प्रचंड प्रतिभावान आहे, असे करण म्हणाला. मी रणबीरसोबत आधीही काम केले आहे आणि आता ‘ब्रह्मास्त्र’बद्दलही उत्साहित आहे, असे करण म्हणाला. ‘ब्रह्मास्त्र’ करण जोहरने प्रोड्यूस केला आहे. यात रणबीर कपूरसोबत करणची आॅल टाईम फेवरेट अ‍ॅक्ट्रेस आलिया भट्टही दिसणार आहे.

Web Title:  not Shah Rukh Khan ranbir kapoor is karan johars all time favourite actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.